मुंबई : २०२३-२०२४ या वर्षांसाठी ‘ऑडिट ब्युरो ऑफ सक्र्युलेशन्स’च्या (एबीसी) अध्यक्षपदी आर. के. स्वामी हंसा ग्रुपचे कार्याध्यक्ष श्रीनिवासन के. स्वामी यांची निवड करण्यात आली आहे. ते सध्या ‘एशियन फेडरेशन ऑफ अ‍ॅडव्‍‌र्हटायिझग’चे अध्यक्ष आहेत. ‘मल्याळा मनोरमा’चे मुख्य सहयोगी संपादक रियाद मॅथ्यू यांची ‘एबीसी’चे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. बेनेट कोलमन अ‍ॅण्ड कंपनी लिमिटेडचे कार्यकारी संचालक मोहित जैन यांची सचिवपदी तर, खजिनदारपदी विक्रम सखुजा यांची निवड करण्यात आली आहे. जाहिरात संस्थांचे प्रतिनिधी म्हणून अध्यक्ष श्रीनिवासन के. स्वामी (आर. के. स्वामी लिमिटेड), खजिनदार विक्रम सखुला (मॅडिसिन कम्युनिकेशन प्रा. लि.), प्रशांत कुमार (ग्रुप एम. मीडिया इंडिया प्रा. लि.), वैशाली वर्मा (इनिशिएटिव्ह मीडिया (इंडिया) प्रा.लि.) यांची निवड करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रकाशक प्रतिनिधी म्हणून उपाध्याक्ष रियाद मॅथ्यू ( मल्याळा मनोरमा कंपनी लिमिटेड), प्रताप पवार (सकाळ पेपर्स प्रा. लिमिटेड), शैलेश गुप्ता (जागरण प्रकाशन लिमिटेड), प्रवीण सोमेश्वर (एचटी मीडिया लिमिटेड), सचिव मोहित जैन ( बेनेट, कोलमन अ‍ॅण्ड कंपनी लिमिटेड), ध्रुबा मुखर्जी ( एबीपी प्रा. लि. ), करण दर्डा (लोकमत मीडिया प्रा. लि.), गिरीश अग्रवाल (डीबी कॉर्प लिमिटेड) यांची निवड करण्यात आली आहे. जाहिरातदार प्रतिनिधी म्हणून करूणेश बजाज (आयटीसी लिमिटेड), अनिरुद्ध हलधर (टीव्हीएस मोटार कंपनी लिमिटेड), शशांक श्रीवास्तव (मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड) यांची निवड करण्यात आली आहे.  सचिवालय प्रतिनिधी म्हणून सरचिटणीस एच. बी. मसानी यांची निवड करण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Srinivasan k swami as the a new president of abc ysh
Show comments