दहावीत शिकणाऱ्या अ‍ॅन्जील अल्बेरो फेस्टो (१५) या विद्यार्थ्यांने शुक्रवारी आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकलेले नाही.
परंतु, डॉन बॉस्को शाळेत दहावीत शिकणाऱ्या अ‍ॅन्जीलला विज्ञान आणि गणित हे दोन विषय कठीण जात होते. त्यामुळे अभ्यासाच्या ताणामुळे त्याने आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बोरिवलीच्या आयसी कॉलनीत फॅमिल्डा नामक इमारतीत आई-वडील व मोठी बहीण यांच्यासोबत अ‍ॅन्जील राहत होता. शुक्रवारी सायंकाळी त्याचे आई-बाबा कामानिमित्त घराबाहेर गेले होते तर मोठी बहीण वस्तू खरेदीसाठी दुकानात गेली होती. त्यावेळी घरात कोणी नसताना अ‍ॅन्जीलने आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Story img Loader