राष्ट्रीय गुणवत्ता सर्वेक्षणातून दहावीतील विद्यार्थ्यांची घसरण उघड

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई : दरवर्षी दहावीच्या निकालाचा आणि विद्यार्थ्यांच्या भरघोस टक्केवारीचा आलेख उंचावत असला तरी राष्ट्रीय गुणवत्ता सर्वेक्षणातून मात्र विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा घसरल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. नुकत्याच दहावी उत्तीर्ण झालेल्या राज्यातील ६६ टक्के विद्यार्थ्यांना गणितात ३५ टक्केही गुण मिळवता आले नाहीत. गणितच नव्हे तर सामाजिक शास्त्रापासून ते विज्ञानात विद्यार्थ्यांची खालावलेली गुणवत्ता अहवालातून दिसत आहे.

शाळापातळीवर तसेच विद्यार्थाना आपल्या भविष्यातील रोजगाराभिमुख संधीसाठी अभ्यास विषय निवडण्यासाठी दहावीचे वर्ष महत्त्वाचे मानले जाते. राज्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या वाढत्या टक्केवारीचे आकडे समोर आले की राज्यातील एकूणच शिक्षण क्षेत्रात विजयोत्सवी वातावरण तयार होते.

चाचणीचे उद्दिष्ट काय?

मंडळाच्या किंवा शाळेच्या परीक्षांच्या ठराविक चौकटीपलीकडे जाऊन विद्यार्थ्यांनी आवश्यक कौशल्ये आत्मसात केली आहेत का हे पाहण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) देशभर विद्यार्थ्यांची चाचणी घेतली. आता अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेआधी जानेवारी महिन्यात ही चाचणी दिली होती. या विद्यार्थ्यांचा राज्य मंडळाच्या परीक्षेचा निकाल घवघवीत लागला असला तरी चाचणीचे निष्कर्ष मात्र निकालाच्या विरुद्ध दिसत आहेत. गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषा या सर्वच विषयांमध्ये राज्यातील विद्यार्थाची परिस्थिती चिंताजनक आहे.

जिल्हानिहाय निकाल

‘एनसीईआरटी’ने केलेल्या या गुणवत्ता सर्वेक्षणात राज्यांचे जिल्हानिहाय निष्कर्ष जाहीर केले आहेत. महाराष्ट्रात मुंबई शेवटच्या क्रमांकावर आहे. मुंबई उपनगर विभागात ३५ टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवणारी सर्वाधिक मुले आहेत. गणितात (८४.८३ टक्के), विज्ञान (७७.४० टक्के), सामाजिक शास्त्रांमध्ये (६३.२७ टक्के) तर इंग्रजीत (७७.५० टक्के) विद्यार्थ्यांना ३५ टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाले आहेत. मुंबई शहर भागातील स्थिती तुलनेने बरी आहे. या भागांत ३५ टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण गणितात (५८.५४ टक्के), विज्ञान (५४.११ टक्के), सामाजिक शास्त्र (३१.६२ टक्के), इंग्रजी (३७.१७ टक्के) असे आहे. ठाणे जिल्ह्यात गणितात (६०. ५१ टक्के), विज्ञान (५८.८४ टक्के), सामाजिक शास्त्रांमध्ये (३७.८१ टक्के) तर इंग्रजीत (४५.९७ टक्के) विद्यार्थ्यांना ३५ टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाले आहेत. विद्येचे माहेरघर म्हणवणाऱ्या पुण्यातही ३५ टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण गणित आणि विज्ञानात ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. गणितात (६६.१५ टक्के), विज्ञान (५८.८४ टक्के), सामाजिक शास्त्र (२९.६८ टक्के) तर इंग्रजीत (४७.३४ टक्के) विद्यार्थी ३५ टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवणारे आहेत.

विदारक चित्र

१) गणितामध्ये राज्यातील सरासरी ६६ टक्के विद्यार्थाना ३५ टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाले आहेत. राज्य मंडळाच्या परीक्षेत मात्र गणितात ८९.१३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

२) विज्ञानात ६०.८६ टक्के मुलांना जेमतेम ३५ टक्क्यांपर्यंत गुण मिळाले आहेत. मात्र, राज्य मंडळाच्या परीक्षेत विज्ञान विषयाचा निकाल हा ९४.३७ टक्के लागला आहे.

३) सामाजिक शास्त्रामध्ये ३७.९९ टक्के मुलांची मजल ३५ टक्क्य़ांपेक्षा कमी गुणांवरच थांबली आहे. राज्य मंडळाच्या निकालानुसार मात्र ९६.१८ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.

४) इंग्रजीत ५६.६४ टक्के मुले ३५ टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवणारी आहेत, तर राज्य मंडळाच्या निकालानुसार ९०.१२ टक्के विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. या सर्वच विषयांत ७६ ते १०० या दरम्यान गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे अवघा अर्धा टक्का ते अडीच टक्क्यांपर्यंत आहे.