राज्यभरातील सर्वसामान्य लोकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या राज्य परिवहन महामंडळाला येत्या सोमवारी ६७ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने होणाऱ्या परिवहन दिनासाठी एसटी महामंडळाने राज्यभरातील आपल्या आगारांमध्ये विविध उपक्रम जाहीर केले आहेत. महामंडळाच्या राज्यभरातील २५० आगारांमध्ये हे कार्यक्रम दिवसभर होतील. परिवहन दिनाचे औचित्य साधून एसटीच्या ताफ्यातील सर्व बसगाडय़ा आतून आणि बाहेरून साफ करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना एसटीचा प्रवास आल्हाददायक वाटेल. त्याचप्रमाणे एसटीची सर्व बसस्थानके स्वच्छ आणि सुशोभित करण्यात येणार आहेत. या दिवशी एसटीने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे स्वागत फुल देऊन केले जाईल. एसटीच्या सर्व २५० आगारांत उत्तम कामगिरी करणारे वाहक, चालक, यांत्रिक विभागातील कर्मचारी यांचाही सत्कार प्रत्येक आगारात करण्यात येईल. या दिवशी एसटीचे अधिकारी प्रत्येक बस स्थानकावर प्रवाशांच्या अडचणी जाणून घेणार आहेत.

Story img Loader