खड्डय़ांमुळे मुंबई महानगर क्षेत्रातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झालेली असताना या खड्डय़ांचा आर्थिक फटका एसटीतील चालकांना बसला आहे. या खड्डय़ांमुळे दादर ते पनवेलदरम्यान चालवण्यात येणाऱ्या गाडय़ांची धाववेळ पाळणे चालकांसाठी अशक्य ठरत आहे. एसटीने या चालकांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांचा पगार कापण्याचा ‘सुलतानी’ निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात चालकांनी नेहरू नगर आगारात सोमवारी दुपारी अचानक संप केला. हा निर्णय कामगार करारातील धाववेळेबाबतच्या कलमाचे उल्लंघन करणारा असल्याने मोठय़ा प्रमाणात आंदोलन करण्यात येईल, असे एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांनी सांगितले.
सद्य’अवस्था’
दादर-पनवेल या दोन शहरांमधील सेवेसाठी एसटीने एक तास १० मिनिटे एवढी धाववेळ निश्चित केली आहे. या मार्गावर एकूण ४५ आणि १४ मोठे सिग्नल आहेत. प्रत्येक थांब्यावर प्रवासी चढण्यासाठी व उतरण्यासाठी एका मिनिटाचा कालावधी धरला, तरी धाववेळेतील ४५ मिनिटे वजा होतात. त्याशिवाय खड्डय़ांमुळे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. कळंबोलीजवळ नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे, मुंब्रा येथील बायपास मार्ग खचल्याने सर्व वाहतूक या मार्गाने वळवली आहे. यामुळे या मार्गावरील गाडय़ांना पनवेलपर्यंत पोहोचण्यासाठी दीड ते दोन तास लागतात, असे चव्हाण म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा