राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांना या महिन्याच्या पगारापासून १० टक्के वाढीव महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र जानेवारी ते एप्रिल २०१४ या कालावधीच्या वाढीव महागाई भत्त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचेही एका पत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे आणि उपध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक व्ही. एन. मोरे यांनी महामंडळाच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन एसटीच्या कर्मचाऱ्यांना येत्या पगारापासून वाढीव महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतल्याचेही या पत्रकात म्हटले आहे.

Story img Loader