राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात ‘एसटी’तर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या चार आणि सात दिवसांच्या पासाच्या दरात १ एप्रिलपासून बदल करण्यात येणार आहेत.
साध्या एस. टी.चे (जलद, रात्रसेवा, शहरी, जनता, यशवंती, मिडी) १५ ऑक्टोबर ते १४ जून या गर्दीच्या हंगामासाठी चार दिवसांच्या पासाचे दर प्रौढ आणि मुलांसाठी आता ७८० रुपये व ३९० रुपये असे तर कमी गर्दीच्या हंगामात म्हणजे १५ जून ते १४ ऑक्टोबर या कालावधीत प्रौढ आणि मुले यांच्यासाठीचे हे दर ७२० रुपये आणि ३६० रुपये असे असणार आहेत.
निम आराम (हिरकणी)चे गर्दीच्या हंगामातील प्रौढ आणि मुलांसाठीचे दर ८९५ व ४५० रुपये आणि कमी गर्दीच्या हंगामातील दर ८२५ रुपये व ४१५ रुपये असे असतील. तर आंतर राज्य (निम आराम व साधी) गाडीसाठी गर्दीच्या हंगामाकरिता प्रौढ व मुलांसाठीचे दर अनुक्रमे ९६० रुपये आणि ४८० रुपये तर कमी गर्दीच्या हंगामासाठी प्रौढ व मुलांसाठी ८९५ व ४५० रुपये असे राहणार आहेत.
सात दिवसांच्या पासाचे दर पुढीलप्रमाणे
१)साधी- गर्दीचा हंगाम (प्रौढ-१ हजार ३६० आणि मुले-६८०), कमी गर्दीचा हंगाम-(प्रौढ १ हजार २५५ रुपये व मुले-६३० रुपये)
२) निमआराम- गर्दीचा हंगाम (प्रौढ- १ हजार ५६० आणि मुले- ७८० रुपये), कमी गर्दीचा हंगाम (प्रौढ-१ हजार ४४० रुपये आणि मुले-७२० रुपये)
३) आंतरराज्य- गर्दीचा हंगाम (प्रौढ-१ हजार ६८० आणि मुले-८४० रुपये), कमी गर्दीचा हंगाम (प्रौढ-१ हजार ५६० रुपये आणि मुले ७८० रुपये)
यापूर्वी देण्यात आलेले पण १ एप्रिलपासून चालू होणारे किंवा १ एप्रिल रोजी चालू असलेले पास त्यांची मुदत संपेपर्यंत वैध असतील. या पासधारकांकडून दरातील फरक वसूल केला जाणार नाही, अशी माहिती महामंडळाच्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा