मुंबईकरांच्या सेवेत गेल्या महिन्यापासूनच दाखल झालेल्या पूर्व मुक्तमार्गावर ‘बेस्ट’ने यशस्वी घोडदौड केल्यानंतर आता राज्य परिवहन महामंडळानेही या मार्गावरून सेवा सुरू करण्याचे ठरवले आहे. पनवेल ते मंत्रालय हा एसटी महामंडळाचा सध्याचा मार्ग पूर्व मुक्तमार्गावरून सुरू करण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे.
त्यामुळे प्रवाशांचा तब्बल अर्धा तास वाचणार आहे, असे एसटीचे व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष दीपक कपूर यांनी सांगितले. ही सेवा २९ जुलैपासून सुरू होणार असून दर दिवशी या मार्गावर २><२ परिवर्तन प्रकाराच्या एसटीच्या ८ फेऱ्या असतील.
पनवेलहून सुटणारी गाडी कामोठे-सीबीडी बेलापूर-नेरूळ-वाशी-छत्रपती शिवाजी टर्मिनस-मंत्रालय या मार्गाने येईल. वाशीवरून बस सुटल्यानंतर कोणत्याही थांब्याशिवाय मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला येणार आहे. या मार्गासाठी एसटी ५२ रुपये तिकीट आकारणार आहे.  
फेऱ्यांच्या वेळा
पनवेलहून :
सकाळी ८.००, ११.२०, दुपारी ३.३० आणि सायं. ७.००
मंत्रालयाहून :
सकाळी ९.३०, दुपारी १२.५०, सायं.१७.३० आणि रात्री २०.३०

Story img Loader