मुंबई: राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करताना अनेकदा सुट्टे पैशांवरून प्रवासी आणि वाहकामध्ये वाद होतात. परंतु, आता एसटी महामंडळाने ‘डिजिटल’ प्रणालीद्वारे तिकीट खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. एसटीच्या सर्व वाहकांसाठी नवी ॲण्ड्राईड तिकीट इश्यू यंत्रे (एटीआयएम) घेतली आहेत. नव्या यंत्रांमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान रोखीने व्यवहार टाळून यूपीआय, क्युआर कोडद्वारे ‘डिजिटल पेमेंट’चा वापर करून तिकीट काढता येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘कॅशलेस इंडिया’च्या धर्तीवर प्रत्येक क्षेत्रात डिजिटल पेमेंट व्हावे यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. त्यादृष्टीकोनातून एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकले आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांना फोन पे, गुगल पेद्वारे तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. वाहकाकडील ॲण्ड्राईड तिकीट यंत्रावरील क्युआर कोडद्वारे प्रवाशांना तिकीटाचे मोजके पैसे डिजिटल स्वरूपात देणे शक्य आहे. परिणामी, सुट्ट्या पैशांवरून वाहक आणइ प्रवाशांमध्ये होणारे वाद टळू शकणार आहेत.

हेही वाचा… मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी दोन तासांचा वाहतूक ब्लॉक

मे. ईबीक्सकॅश मोबिलिटी सॉफ्टवेअर लिमिटेड यांच्या सहकार्याने एसटी महामंडळातील सर्व वाहकांसाठी नवीन ॲण्ड्राईड आधारित डिजिटलची सुविधा असलेली तिकीट यंत्रे घेण्यात आली आहेत. यूपीआय पेमेंटद्वारे क्युआर कोडच्या माध्यमातून एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये तिकीट विक्री सुरू झाली आहे. डिजिटल तिकीट प्रणालीचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St corporation has provided the facility of buying tickets through digital system upi qr code facility available mumbai print news dvr