एसटी महामंडळाच्या ताफ्यातील ‘हिरकणी’ बस राज्यभरातील प्रवाशांच्या पसंतीस उतरली असून ही बाब लक्षात घेऊन एसटी महामंडळाने आपल्या ताफ्यात मार्च २०२३ पर्यंत २०० ‘हिरकणी’ बसगाड्या समाविष्ट करण्याचा संकल्प सोडला आहे. या बसगाड्यांमध्ये प्रवाशांसाठी पुश बॅक आसन व्यवस्थाही असणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
एसटीची हिरकणी बस १९८२ मध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. या बसगाड्या प्रवाशांच्या पसंतीस उतरल्या आहेत. त्यामुळे साध्या गाड्यांबरोबरच हिरकणीचीही संख्या वाढविण्यात आली. या बस रातराणी म्हणूनही चालवण्यात आल्या. कालांतराने खासगी प्रवासी बस वाहतुकदारांनी निर्माण केलेल्या स्पर्धेमुळे एसटी महामंडळाने वातानुकूलित शिवनेरी, शिवशाही आसन आणि शयनयान, आश्वमेध, मिडी यशवंती सेवेत आणल्या. तर लवकरच शिवाई बसही येतील. या बस सेवेत आणताना मात्र हिरकणी बसची संख्या कमी करण्यात आली. कलमर्यादा संपलेल्या हिरकणी बस साध्या लाल बसमध्ये रूपांतरित करण्यात येत आहेत. एकीकडे प्रवाशांकडून पसंती मिळत असताना त्यातुलनेत ताफ्यात या बसगाड्या कमी प्रमाणात दाखल होऊ लागल्या. मात्र आता हिरकणी बसची संख्या कमी न करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.
हेही वाचा >>> महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरण: अण्णा हजारेंची उच्च न्यायालयात याचिका
सध्या एसटीच्या ताफ्यात ४०० हिरकणी बस असून यापैकी २०० बसची कलमर्यादा संपुष्टात आल्याने त्या साध्या बसमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहेत. त्यामुळे फक्त २०० हिरकणी बस ताफ्यात राहतील. मात्र महामंडळाने विनावातानुकूलित ७०० बस दाखल करण्याचा निर्णय घेतला असून यापैकी २०० बस हिरकणी असतील. प्रथम महामंडळ ५०० बसची बांधणी करणार असून त्यानंतर २०० हिरकणी बसची बांधणी करून त्या मार्च २०२३ पर्यंत ताफ्यात दाखल केल्या जाणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.
या बसमध्ये 3३ पुशबॅक आसने आहेत. दोन आसनांतील अंतर इतर बसेसच्या तुलनेत जास्त असल्याने प्रवाशांना आरामात बसता येणार आहे. या बसची रंगसंगती हिरकणीसारखीच असेल.
सध्या राज्यात एसटीच्या २५६ मार्गांवर ५०० हून अधिक रातराणी बसगाड्या धावत असून यात साध्या, निमआराम तसेच शयन आणि आसन प्रकारातील रातराणी बस आहेत. नव्या हिरकणीपैकी काही बस रातराणी म्हणून सेवेत धावतील.