एसटी कामगारांचे नेते अजय गुजर यांनी त्यांच्या नेतृत्वातील संघटनेचा संप मागे घेतला आहे. यावेळी त्यांनी एसटी कर्मचारी तात्पुरते भावनाविवश झाल्याचं सांगत कुणीतरी त्यांना भडकावत असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच गुणरत्न सदावर्ते यांना आमची केस लढायची नसेल तर आम्ही एसटी कर्मचारी संघटनेतर्फे दुसरे वकील लावू, असा इशाराही दिला. ते संप मागे घेतल्याची घोषणा करताना बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजय गुजर म्हणाले, “एसटी कर्मचारी तात्पुरते भावनाविवश आहेत. ते लवकरच संप मागे घेतील. आम्ही त्यांना समजाऊन सांगितल्यावर ते संप मागे घेतील. या कर्मचाऱ्यांना कुणीतरी भडकावत आहे. त्यांना आम्ही व्यवस्थित समजाऊन सांगू.”

सदावर्ते एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देत आहेत का? अजय गुजर म्हणाले…

“सदावर्ते हे वकील आहे. वकिलांनी वकिलांचं काम करावं. सदावर्ते म्हणतात तसं हा दुखवटा असला तरी तो दुखवटा शांततेत करायचा असतो, नाचून भजनकीर्तन करून दुखवटा करू नये. हा दुखवटा शांततेत करायला हवा,” असं अजय गुजर यांनी सांगितलं.

यावेळी अजय गुजर यांनी आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असल्याचं सांगत गरज पडल्यास दुसरा वकील देऊ असं म्हटलं आहे. ते म्हणाले, “आम्ही आमच्या विलनीकरणाच्या भूमिकेशी ठाम आहोत. गुणवंत सदावर्ते यांना आमची केस लढायची नसेल तर साहजिकपणे आम्हाला दुसरे वकील पाहावे लागतील. त्यानिमित्ताने आम्ही कर्मचारी संघटनेतर्फे दुसरे वकील लावू.”

एकूणच गुणवंत सदावर्ते आणि अजय गुजर यांच्यात मतभेद असल्याचं दिसत आहे. सदावर्तेंनी देखील गुजर यांना टोला लगावत एसटी कर्मचारी संप करत नसून दुखवटा पाळत आहेत असं म्हटलंय.

अजय गुजर म्हणाले, “विलिनीकरणाच्या मागणीवर आम्ही आजही ठाम आहोत आणि उद्याही ठाम असणार आहोत. परंतु गेल्या दीड महिन्यांपासून हा जो लढा सुरू आहे, तो न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे आम्ही पुकारलेला लढा हा जवळपास ४५ दिवसांपासून कर्मचारी करत आहेत. तारखेवर तारीख पडत आहे आज न्यायालयात प्राथमिक अहवाल सादर झालेला आहे. आम्ही मंत्री महोदयांशी चर्चा केली, विलिनीकरणाबाबतचा समितीचा निर्णय दोघांनाही मान्य राहणार आहे.”

तसेच, एसटी कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाचा लढा न्यायालयावर सोपवलेला आहे. न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य असेल. राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की, सर्व कर्मचाऱ्यांनी आपण पुकारलेला लढा चर्चा केल्याप्रमाणे आता थांबवत आहोत. २२ डिसेंबरपर्यंत तुम्ही कामावर हजर व्हा. आपल्यावरील कारवाई मागे घेण्याची विनंती आम्ही केली आहे, असंही गुजर यांनी सांगितलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St employee leader anil gujar warn gunratn sadavarte over his stands pbs