राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांना अडीच हजार रुपये तर अधिकाऱ्यांना पाच हजार रुपये दिवाळी भेट देण्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी जाहीर केले. १९९८ नंतर प्रथमच दिवाळी भेट दिली जात असून त्याचा लाभ एक लाख ७ हजार कर्मचाऱ्यांना आणि सुमारे ५०० अधिकाऱ्यांना मिळणार असल्याचे रावते यांनी सांगितले.
एसटीच्या कर्मचाऱ्यांना बोनस दिला जात नाही. पण सुट्टीनिमित्त तीन हजार जादा गाडय़ा सोडल्या जाणार असून सुमारे ३७ हजार चालक आणि ३६ हजार ५०० वाहक व अन्य कर्मचारी हे प्रवाशांना सेवा देण्यासाठी दिवाळीत कामावर असतील. त्यामुळे दिवाळी भेट म्हणून ही रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती रावते यांनी पत्रकारांना दिली.

Story img Loader