अवैध प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण, राज्य सरकारकडून येणे असलेली २७५ कोटी रुपयांच्या रकमेची पूर्तता, प्रवासी कर व वाहनकर यांत सवलत, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न अशा विविध आव्हानांवर ठोस उपाययोजना न केल्यास ५ ऑगस्टपासून एसटी कामगार व्यापक धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने दिला आहे. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज्य सरकार विविध प्रलंबित बाबी सोडवत आहे. त्यामुळे त्यांनी एसटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांकडेही लक्ष द्यायला हवे, असे एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांनी सांगितले.

Story img Loader