मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच वेतन मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना १२,५०० रुपये सण अग्रीम रक्कम आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळणार अ एसटी महामंडळातील तृतीय व चतुर्थ वर्ग कर्मचाऱ्यांना दरमहा मूळ वेतन २५,५०० रुपयांपेक्षा अधिक नाही, अशा कर्मचाऱ्यांना दिवाळी, रमजान ईद, ख्रिसमस, पारशी नववर्ष, संवत्सरी, रोश-होशना, वैशाखी पौर्णिमा (बुध्द जयंती), स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन या सणांसाठी सण अग्रिम वेतन १० हजार रुपये दिले जाते.
हेही वाचा >>> मध्यरेल्वेनं गुरूवारी घेतला अघोषित ब्लॉक, वाहतूक कोलमडली; कारण काय? वाचा…
कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू केले असल्याने सण अग्रिम अनुज्ञेयतेच्या वेतन मर्यादेतही बदल करण्यात आला आहे. त्यानुसार एसटी महामंडळातील तृतीय व चतुर्थ वर्गातील कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन ४३,४७७ रुपये अथवा त्यापेक्षा कमी आहे, अशा कर्मचाऱ्यांना सण अग्रिम १२,५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देऊन दिवाळी भेट दिली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव एसटी महामंडळ अध्यक्ष आणि परिवहन मंत्री म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवण्यात आला आहे, अशी माहिती एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.