एसटी महामंडळाने विजेवर धावणारी पहिली शिवाई वातानुकूलित बस पुणे ते नगर मार्गावर चालवल्यानंतर येत्या डिसेंबर पासून मुंबई-पुणे मार्गावर शिवाई बस प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. या मार्गावर १०० शिवाई बस चालवण्यात येणार आहेत.

हेही वाचा- मुंबई महानगरपालिकेच्या १२ उद्यानांचा खासगी संस्थेकडून गैरवापर

Uttar Pradesh News Denied petrol
Uttar Pradesh : हेल्मेट न घातल्याने पेट्रोल नाकारले, संतप्त लाइनमनने थेट पेट्रोल पंपाची वीजच खंडीत केली; प्रशासने दिले चौकशीचे आदेश
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
MMRDA Contractors given extension for work on Metro 9 and Metro 7A lines Mumbai news
‘मेट्रो ९’ आणि ‘मेट्रो ७ अ’ मार्गिकांच्या कामाला मुदतवाढ; मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार
cheapest electric car ligier mini ev could launch in 1 lakh rupees know features design battery details range
फक्त १ लाख रुपयात लॉंच होऊ शकते ‘ही’ इलेक्ट्रिक कार! सिंगल चार्जवर मिळेल १९२ किमीची रेंज
nashik banned nylon manja caused fatalities and power outages
नाशिकमध्ये नायलॉन मांजा तारांमध्ये अडकून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार
Belapur cidco parking news in marathi
नवी मुंबई : सिडको मंडळाचे वाहनतळ धोकादायक स्थितीत
Thane Traffic Branch, Thane Police ,
ठाणे वाहतूक शाखेच्या विभाजनाचा प्रस्ताव, वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी ठाणे पोलिसांची निर्णय
nashik special campaign for provide electricity connections to Zilla Parishad owned Anganwadi
७४२ अंगणवाड्यांना वीज जोडणीची प्रतिक्षा, विशेष मोहिमेतंर्गत कार्यवाही

प्रदूषणुक्त प्रवास, इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने विजेवरील वातानुकूलित शिवाई बस चालवण्याचा निर्णय घेतला. अशा १५० बस महामंडळाच्या ताफ्यात टप्प्याटप्यात येणार असून पहिल्या टप्यात ५० बस आणि दुसऱ्या टप्प्यात १०० बस दाखल होतील. ५० बसपैकी दोन बस पुणे -नगर -पुणे मार्गावर नुकत्याच चालवण्यात आल्या. मुंबई, ठाणे -पुणे मार्गावरही डिसेंबरपासून शिवाई बस चालवण्याचे नियोजन आहे. कंपनीकडून या बस एसटी महामंडळाला मिळण्यास बराच विलंब झाला आहे. या मार्गावर टप्प्याटप्प्यात ऑक्टोबर २०२२ पासून ३० शिवाई बस येणार होत्या. त्यानंतर जानेवारी २०२३ पासून आणखी शिवाई बस प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचे नियोजन होते. मात्र त्याला विलंबच झाला.

हेही वाचा- मुंबई : झोपडपट्टी ही मोठी समस्या असल्याचे कारण बाहेरून शहरात तासाला १० ते १५ कुटुंब होतात स्थलांतरित

सध्या मुंबईतील परेल आगार सोडता अन्य आगारात विजेवरील शिवाई बससाठी चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण केले आहे. ठाण्यातही बससाठी चार्जिंग सुविधा उपलब्ध केली आहे. परेल आगारात लवकरच हे काम होईल, असे एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले.

१०० बस दाखल झाल्यानंतर त्यापैकी ९६ बस विविध मार्गावर चालवण्याचे नियोजन केले आहे.

दादर ते पुणे रेल्वे स्थानक व्हाया चिचंवड- २४ बस
परेल-स्वारगेट-२४ बस
ठाणे-स्वारगेट-२४ बस
बोरीवली-स्वारगेट-२४ बस

हेही वाचा- ‘सीटबेल्ट’ नसल्यास वाहन योग्यता प्रमाणपत्रास नकार?; ‘आरटीओ’कडून नव्या नियमाचा विचार

शिवनेरी बसची संख्या कमी

एसटीच्या ताफ्यात करोनापूर्वी एकूण १४७ शिवनेरी बस होत्या. यात ९७ बस एसटीच्या मालकीच्या आणि ५० बस भाडेतत्वावरील होत्या. आता हीच संख्या एकूण ११० पर्यंत कमी झाली आहे. यापैकी ९० मालकीच्या आणि २० भाडेतत्त्वावरील आहेत. शिवनेरीसह शिवशाही बसही या मार्गावर चालवण्यात येतात. तर दोन अश्वमेध आणि निमआराम बसही आहेत

Story img Loader