मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचे वाहक आणि प्रवाशांमध्ये सुट्या पैशांवरून होणाऱ्या वादावर यूपीआयद्वारे तिकीट काढण्याचा तोडगा सुचवण्यात आला आहे. या आवाहनाला प्रवाशांकडून प्रतिसाद मिळू लागला असून, यूपीआयद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नात दुपटीने वाढ झाली आहे. याबरोबरच परिपत्रक काढून वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी रकमेमध्ये १०० रुपयापर्यंत सुट्टे पैसे देण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.

एसटी महामंडळाने प्रत्येक वाहकाकडे अँड्रॉइड इलेक्ट्रॉनिक तिकीट इशू यंत्र (एटीआयएम) दिले आहे. या यंत्राच्या माध्यमातून यूपीआयद्वारे तिकीट काढता येते. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट काढताना यूपीआयचा वापर केल्यास सुट्ट्या पैशामुळे होणारे वाद टाळता येतील, अशी सूचना परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली होती. त्यानुसार महामंळाने यूपीआय पेमेंट वाढविण्यासाठी प्रयत्न केला. त्याला प्रतिसाद मिळत आहे.

UPI
UPI Rule Change : …अन्यथा १ फेब्रुवारीपासून UPI पेमेंट करता येणार नाही, करावा लागणार ‘हा’ महत्त्वाचा बदल
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Guardian Minister Shivendra Singh Raje Bhosle Mitra Mandal circle of friends latur
लातूरामध्ये पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र मंडळाची ‘अचानक’ स्थापना
Ajit Pawar On MSRTC
Ajit Pawar On MSRTC : एसटीच्या तिकीट दरात वाढ होणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली महत्वाची माहिती
Crop insurance one rupee, Crop insurance ,
एक रुपयात पीकविमा बंद? बोगस अर्ज, गैरव्यवहारांमुळे समितीची सरकारला शिफारस
List of Finance Ministers of India
Finance Ministers of India : १९४७ ते २०२४ पर्यंत केंद्रीय अर्थमंत्री हे पद कुणी कुणी भुषवलं आहे तुम्हाला माहीत आहे का?
simplify new income tax law
नव्या प्राप्तिकर कायद्यात सुलभपणा आणण्याचा प्रयत्न, अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधेयक येण्याची शक्यता
Image Of Nirmala Sitharaman
Nirmala Sitharaman : निर्मला सीतारमण सलग आठव्यांदा सादर करणार अर्थसंकल्प, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून

यूपीआयद्वारे उत्पन्न (दर वाढण्यापूर्वी)

२१ जानेवारी ८७.५८ लाख रुपये

२२ जानेवारी ८६.५० लाख रुपये

२३ जानेवारी ८४.२३ लाख रुपये

२४ जानेवारी ६७.३६ लाख रुपये

दर वाढल्यानंतर

२६ जानेवारी १.५३ कोटी रुपये

२७ जानेवारी १.४६ कोटी रुपये

२८ जानेवारी १.२५ कोटी रुपये

२९ जानेवारी १.१९ कोटी रुपये

३० जानेवारी १.२५ कोटी रुपये

Story img Loader