मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचे वाहक आणि प्रवाशांमध्ये सुट्या पैशांवरून होणाऱ्या वादावर यूपीआयद्वारे तिकीट काढण्याचा तोडगा सुचवण्यात आला आहे. या आवाहनाला प्रवाशांकडून प्रतिसाद मिळू लागला असून, यूपीआयद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नात दुपटीने वाढ झाली आहे. याबरोबरच परिपत्रक काढून वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी रकमेमध्ये १०० रुपयापर्यंत सुट्टे पैसे देण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एसटी महामंडळाने प्रत्येक वाहकाकडे अँड्रॉइड इलेक्ट्रॉनिक तिकीट इशू यंत्र (एटीआयएम) दिले आहे. या यंत्राच्या माध्यमातून यूपीआयद्वारे तिकीट काढता येते. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट काढताना यूपीआयचा वापर केल्यास सुट्ट्या पैशामुळे होणारे वाद टाळता येतील, अशी सूचना परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली होती. त्यानुसार महामंळाने यूपीआय पेमेंट वाढविण्यासाठी प्रयत्न केला. त्याला प्रतिसाद मिळत आहे.

यूपीआयद्वारे उत्पन्न (दर वाढण्यापूर्वी)

२१ जानेवारी ८७.५८ लाख रुपये

२२ जानेवारी ८६.५० लाख रुपये

२३ जानेवारी ८४.२३ लाख रुपये

२४ जानेवारी ६७.३६ लाख रुपये

दर वाढल्यानंतर

२६ जानेवारी १.५३ कोटी रुपये

२७ जानेवारी १.४६ कोटी रुपये

२८ जानेवारी १.२५ कोटी रुपये

२९ जानेवारी १.१९ कोटी रुपये

३० जानेवारी १.२५ कोटी रुपये