महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कामगारांच्या कराराबाबतची चर्चा अद्याप सुरू असून कामगारांना या करारापोटी पाच हजार रुपयांची रक्कम आगाऊ देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली असून २-४ दिवसांत त्याचे वाटप होणार आहे. त्याचप्रमाणे सात हजार रुपये वेतन असलेल्या सुमारे ३० हजार कामगारांना सानुग्रह अनुदानापोटी अडीच हजार रुपये देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली असून त्याचे वाटप सोमवारपासून करण्यात येणार आहे.
एसटी महामंडळाचे सुमारे एक लाख कामगार असून त्यांच्या करारासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. कामगार संघटनांच्या काही मागण्यांबाबत अद्याप सरकारशी वाटाघाटी सुरू असून १८ नोव्हेंबर रोजी पुढील बैठक होणार आहे. नवा करार एप्रिल २०१२ पासून लागू होणार आहे. महामंडळाची फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या महागाई भत्त्याचीही थकबाकी राहिली असून त्याचेही वाटप करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत, असे  महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी सांगितले.  महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना ‘फेस्टविल अ‍ॅडव्हान्स’ म्हणून पाच हजार रुपये देण्यात येतात. त्याचे वाटप सध्या सुरू असून त्यासाठी महामंडळावर ५० कोटी रुपये तर सानुग्रह अनुदानापोटी सुमारे साडेसात कोटी रुपयांचा भार महामंडळावर पडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.      

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा