एसटी कामगरांच्या वेतन कराराच्या अंमलबजावणीत दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ एसटी कामगार संघटना कृती समितीने १ जुलैपासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे. एसटी कामगारांच्या २०१२-१६ या कालावधीसाठी वेतनवाढीच्या करारास राज्य शासनाने दोन महिन्यांपूर्वी मंजुरी दिली. मात्र या करारावर अद्याप स्वाक्षऱ्या न झाल्यामुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. वेतन कराराची अंमलबजावणी होत नसल्यामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. कराराची अंमलबजावणी त्वरित न झाल्यास १ जुलैपासून बेमुदत संप करण्यात येईल, असा इशारा कामगारांच्या सहा संघटनाच्या संयुक्त कृती समितीने दिला आहे.
राष्ट्रीय एसटी कामगार काँग्रेस, महाराष्ट्र एसटी कामगार सेना, कास्ट्राइब राज्य परिवहन कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस, महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन, महाराष्ट्र एसटी कामगार काँग्रेस या सहा संघटनांनी मंगळवारी एसटीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांची भेट घेऊन या कराराची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली. यावेळी मुंबई सेंट्रल मुख्यालयात कामगारांनी काळ्या टोप्या घालून व्यवस्थापनाचा निषेध केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St worker strike from july
Show comments