मुंबई : ‘राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा २०२४’मधील (एनआयआरएफ) देशातील सर्वोच्च १०० महाविद्यालयांच्या यादीत मुंबईतील एकमेव फोर्ट परिसरातील सेंट झेविअर्स महाविद्यालयाने ५२.६० गुण प्राप्त करून ८९ वे स्थान पटकावले. तर पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय ५६.७७ गुणांसह ४५ व्या स्थानी, नागपूरमधील शासकीय विज्ञान संस्था ५४.९१ गुणांसह ६४ व्या स्थानी आणि अमरावतीतील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय ५१.८६ गुणांसह ९९ व्या स्थानी आहे.

सेंट झेविअर्स महाविद्यालयाचे विविध निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाच्या संकुलात असणाऱ्या सोयी-सुविधांचाही विचार करण्यात आला. महाविद्यालयाने संशोधन निकषात १०० पैकी ३०.१५ गुण, माजी विद्यार्थ्यांचा मागोवा आणि उद्योग क्षेत्रातील कामगिरी निकषात ७४.१७ गुण, सर्वसमावेशक शिक्षण व अभ्यासक्रम व्याप्ती निकषात ५९.४४ गुण, नवीन अभ्यासक्रम, शिक्षक संख्या व त्यांची पात्रता, अध्यापन व अभ्यासपद्धती निकषात ४७.८३ गुण, समाजातील नागरिकांचा महाविद्यालयाबद्दलचा दृष्टिकोन निकषात ४४.७२ गुण प्राप्त केले.

Savitribai Phule Pune University
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आता आंतरराष्ट्रीय स्तरावर… चार देशांत होणार विद्यापीठाचे केंद्र
29th October 2024 Horoscope Today
Daily Horoscope, 29 October : धनत्रयोदशीला मेष, सिंहसह…
जागावाटपाचा घोळ मिटेना! महायुती, महाविकास आघाडीत नुसत्याच चर्चेच्या फेऱ्या; अंतिम निर्णयाकडे लक्ष
investment expected in textile industry
वस्त्रोद्योगात ९५ हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित; पीएलआय’मुळे परदेशी गुंतवणूकदारांतही वाढते आकर्षण
st seats challenge for bjp in maharashtra
सोशल इंजिनिअरिंगमध्ये तरबेज असलेल्या भाजपाला आदिवासींच्या राखीव जागा जिंकण्यात अपयश? महाराष्ट्र-झारखंडमधील परिस्थिती काय?
Organized 50 Chowk Sabhas by Congress Sevadal
नाशिक : काँग्रेस सेवादलातर्फे ५० चौकसभांचे आयोजन
Education Opportunity Apprenticeship with ONGC Oil and Natural Gas Corporation Ltd
शिक्षणाची संधी: ओएनजीसीत अॅप्रेंटिसशिप
Congress established central channel for effective coordination during assembly elections said Pramod More
काँग्रेसची पहिली यादी २० ऑक्टोबरला; छाननी समितीत ८४ जागांवरील उमेदवारांवर चर्चा

हेही वाचा – स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील ५९ पोलिसांना पदके जाहीर, मुंबईतील सदानंद राणे, हातिस्कर व होनमाने यांचा समावेश

हेही वाचा – मुंबई : ‘मेट्रो १’वरील दैनंदिन प्रवासी संख्येचा विक्रम, मंगळवारी ५ लाखांहून अधिक प्रवाशांनी केला प्रवास

‘एनआयआरएफ’मध्ये गतवर्षी १०१ ते १५० या क्रमवारीत होतो, त्यामधून ८९ व्या स्थानी येणे ही कौतुकास्पद बाब आहे. मात्र काहीसे असमाधानीही असून पुढच्या वर्षी अधिक चांगला क्रमांक मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. गेल्या ३ ते ४ वर्षांत व्यवस्थापनाने शिक्षक व विद्यार्थ्यांच्या संशोधनाला प्रोत्साहन दिल्यामुळे देशातील सर्वोच्च १०० महाविद्यालयांच्या यादीत क्रमांक लागला. विद्यार्थी, शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी, व्यवस्थापन आदी सर्वांच्या सहकार्याने हे यश संपादन केले आहे’, असे मत सेंट झेविअर्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे यांनी व्यक्त केले.