मुंबई : ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेच्या गोरेगाव चित्रनगरीतील सेटला शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास आग लागली. चित्रनगरीतील एका मोठ्या स्टुडिओत तळमजल्याला ही आग लागली. या आगीत मालिकेचे सगळे सामान जळून खाक झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याच सेटला लागून दुसऱ्या एका मालिकेचा सेट आहे. याही सेटला आगीने घेरले असल्याचे सांगण्यात आले. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या ताबडतोब घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सेटवर काही कलाकार आगीत अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Star plus channel gum hai kisi ke pyaar mein serial set fire mumbai print news ysh