‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’ला प्रारंभ; आकर्षक बक्षिसांचा वर्षांव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’च्या पाचव्या पर्वाला १६ जानेवारीपासून सुरुवात झाली. या महोत्सवांतर्गत ग्राहकांवर विविध आकर्षक भेटवस्तूंचा वर्षांव करण्यात येणार असल्यामुळे खरेदीचा आनंद द्विगुणित होणार आहे. या महोत्सवात बृहन्मुंबई परिसरातील अनेक शोरूम्स सहभागी झाले आहेत. ग्राहकांना वॉशिंग मशीन, टीव्ही, फ्रिज, गिफ्ट कूपन, एसी, ओव्हन अशी आकर्षक पारितोषिके जिंकता येणार आहेत. महोत्सवाच्या अखेरीस पहिल्या भाग्यवान विजेत्याला ‘केसरी टुर्स’कडून सहलीचे पॅकेज दिले जाणार आहे. हा खरेदी महोत्सव २७ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

‘रिजेन्सी’ समूह प्रस्तुत ‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’साठी ‘वास्तुरविराज’ आणि ‘पितांबरी’ पावर्ड बाय पार्टनर आहेत.

‘एम. के. घारे ज्वेलर्स’ हे या फेस्टिव्हलचे गोल्ड पार्टनर आहेत. ‘एम. व्ही. पेंडुरकर ज्वेलर्स’, ‘व्ही. एम. मुसळुणकर अ‍ॅण्ड सन्स ज्वेलर्स प्रा. लि.’, ‘नम्रता ज्वेलर्स’, ‘मे. पांडुरंग हरी वैद्य अ‍ॅण्ड सन्स ज्वेलर्स’, ‘उज्ज्वल तारा’ हे सिल्व्हर पार्टनर आहेत.

याशिवाय ‘अपना बाजार’, ‘राणेज पैठणी’ आणि ‘अजय अरविंदभाई खत्री’ हे या फेस्टिव्हलचे गिफ्ट पार्टनर आहेत. फूड अ‍ॅण्ड बेवरेजेस पार्टनर ‘अंग्रेजी ढाबा’, ट्रॅव्हल पार्टनर ‘केसरी टूर्स’, एंटरटेनमेंट पार्टनर ‘एनडीज फिल्म वर्ल्ड’, हॉस्पिटॅलिटी पार्टनर ‘लॅण्डमार्क मर्सिडीज’ आहेत.

स्पर्धेचे स्वरूप

* लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये सहभागी असलेल्या दुकानांमध्ये ५०० रुपयांपेक्षा अधिक रकमेची तसेच दागिन्यांच्या दुकानांमधून ३००० रुपयांहून अधिक रकमेची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एका बिलावर एक कूपन दिले जाईल.

* ते कूपन भरून दुकानात असलेल्या लोकसत्ताच्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे.

* अर्धवट माहिती भरलेले कूपन स्वीकारले जाणार नाही.

* ड्रॉपबॉक्समध्ये जमा होणाऱ्या कूपनमधून विजेत्यांची निवड केली जाईल व त्यांची नावे ‘लोकसत्ता मुंबई’मधून प्रसिद्ध क रण्यात येतील.

* अटी-शर्ती लागू आहेत.

या महोत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या दुकानदारांनी अधिक माहितीसाठी नमिता खांडभोर यांच्याशी ८१०८३८८१२२ या आणि निक्षित राठोड यांच्याशी ९८२०५५१२५० यांच्याशी संपर्क साधावा.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Start of loksatta mumbai shopping festival
Show comments