उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे राज्याचा अर्थसंकल्प २० मार्चला दुपारी दोन वाजता राज्य विधिमंडळाला सादर करतील. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज ११ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत पार पडणार असल्याचे संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठका विधानभवनात बुधवारी पार पडल्या. त्यात विधिमंडळाचे कामकाज निश्चित करण्यात आले. अधिवेशाचे कामकाज ३० दिवस चालावे, अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली होती. राज्यपालांचे अभिभाषण ११ मार्चला होईल. विधानसभेचे कामकाज २६ तर विधानपरिषदेचे २४ दिवस चालेल. दुष्काळावर सविस्तर चर्चेची मागणी करण्यात आली आहे. सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव असावा की विरोधकांचा, याबाबत अध्यक्ष व सभापती निर्णय घेतील. विधिमंडळात ११ विधेयके मांडली जातील. त्यापैकी तीन आधीची प्रलंबित असलेली विधेयके असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा