मुंबई : एसटी महामंडळाच्या ८७ हजार कर्मचाऱ्यांच्या जून महिन्याच्या वेतनाचा प्रश्न अखेर सुटला असून दोन दिवस सुट्टी असल्याने १५ जुलैपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर वेतन जमा होईल. राज्य सरकारने एसटी महामंडळाला मे महिन्याच्या सवलतमूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी २३०.०६ कोटी रुपये निधी वितरित करण्यास गृह विभागाने मंजुरी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : डेंग्यू, हिवतापाच्या डासांची उत्पत्ती रोखणे अशक्य – आरोग्य विभागाच्या सहसंचालक

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा गुंता अद्याप सुटलेला नाही. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी एसटी महामंडळाला राज्य सरकारवर अवलंबून राहावे लागते. मात्र, राज्य सरकारकडून सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी मिळणाऱ्या रकमेस विलंब झाल्यास, एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडते. मात्र, १२ जुलै रोजी मे महिन्याचे सवलतमूल्याच्या प्रतिपुर्तीपोटी २३०.०६ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. याबाबतचा गृह विभागाने शासन निर्णय जारी केला असून यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State government declare rupees 230 crore for st mahamandal employees salary mumbai print news css