मुंबई : मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटीशकालीन नावे बदलण्याच्या हालचाली शासन दरबारी सुरू झाल्या आहेत. करी रोड, सॅन्डहर्स्ट रोड, परळ अशा आठ ते १० स्थानकांच्या नामांतराचा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला आहे. तो आज, बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येणार आहे. चर्चगेट स्थानकाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव असला, तरी त्याबाबत संभ्रम असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा >>> मोदींच्या हस्ते हजारो कोटींच्या रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी

emergency qr code on vehicles loksatta
नागपूर : अपघातग्रस्ताची ओळख करून देणार ‘क्यू आर कोड’, तात्काळ उपचारासाठी…
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Olympics to visit India How is the 2036 Games being planned Why are more than one city preferred 
ऑलिम्पिकचे भारतभ्रमण? २०३६ च्या स्पर्धेचे नियोजन कसे? एकापेक्षा अधिक शहरांना का पसंती?
PCB confident about stadium renovation assures that preparations for Champions Trophy are on track
स्टेडियम नूतनीकरणाबाबत ‘पीसीबी’ निश्चिंत; चॅम्पियन्स करंडकाची तयारी प्रगतिपथावर असल्याची ग्वाही
Vaikunth Crematorium
वैकुंठात असुविधा, भटक्या श्वानांचाही त्रास, नक्की काय आहे प्रकार?
yard remodeling trains
नागपूर : यार्ड रि-मॉडेलिंगसाठी दिल्ली मार्गावरील काही रेल्वेगाड्या रद्द
palghar Valsad passenger train
पालघर : वलसाड फास्ट पॅसेंजरचे दैनंदिन प्रवासी हवालदिल, जागा पकडण्यासाठी घोलवड पर्यंत धाव
Savitribai Phule Pune University rule challenged in High Court
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियमाला उच्च न्यायालयात आव्हान

खासदार राहुल शेवाळे यांनी मुंबईतील उपनगरी रेल्वे स्थानकांची ब्रिटीशकालीन नावे बदण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानुसार मंगळवारी झालेल्या बैठकीत स्थानकांच्या नामांतराबाबत चर्चा झाली. चर्चगेट स्थानकाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तर वांद्रे टर्मिनसला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याबाबतही चर्चा झाली. मात्र पुनर्नांमाकन करताना केवळ राष्ट्रीय पुरुषांचा आदर दाखविण्यासाठी किंवा भाषाविषयक स्थानिक लोकांच्या भावनांचे समाधान व्हावे म्हणून नामांतर करू नये, असा केंद्राचा नियम आहे. त्यामुळे ठाकरे यांचे देता येणार नाही याकडे लक्ष वेधण्यात आले. असे असले तरी मंत्रिमंडळ बैठकीत ठाकरे यांच्या नावाची शिफारस केली जाऊ शकते.

दादर स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी विविध संघटनांकडून वारंवार केली जाते. मात्र त्याऐवजी परळ टर्मिनसला डॉ. आंबेडकर यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आहे. बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर तो केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठविण्यात येणार असून त्यांच्या मान्यतेनंतर रेल्वे मंत्रालय स्थानकांच्या नामांतराची प्रक्रिया पूर्ण करेल. मुंबई सेंट्रल टर्मिनसचा नामविस्तार नाना शंकरशेठ मुंबई सेंट्रल टर्मिनस असा करण्याचा निर्णय १२ मार्च २०२० रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असून जुलै २०२०मध्ये तो पुढील कार्यवाहीसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठविण्यात आला होता

मध्य रेल्वे

करी रोड लालबाग

सॅन्डहर्स्ट रोड डोंगरी

पश्चिम रेल्वे

मरीन लाईन्स मुंबादेवी

चर्नी रोड गिरगांव

ग्रँटरोड गावदेवी

हार्बर रेल्वे

कॉटन ग्रीन काळाचौकी

रे रोड घोडपदेव

डॉकयार्ड माझगाव

किंग सर्कल तीर्थंकर पार्श्वनाथ

Story img Loader