मुंबई : महायुतीमध्ये भाजप मोठा भाऊ असून आवश्यकतेनुसार मोठय़ा भावालाच त्याग करावा लागतो, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबई भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले. राज्यात तीन पक्षांचे सरकार असले तरी भाजपच्या ध्येयधोरणात तसूभरही बदल होणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजप पदाधिकारी व नेत्यांची दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी फडणवीस म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आणण्याचा आपला संकल्प असून तो केवळ भाजपसाठी नाही, तर देशासाठी महत्त्वाचा आहे. देशासाठी त्याग करण्याची आपल्या कार्यकर्त्यांची तयारी असून लोकशाही मार्गाने देशाला परमोच्च शिखरावर नेण्यासाठी आपण लढाई दिली पाहिजे.

Ashok Uike, Vasant Purke
राळेगावमध्ये भाजपचा अतिआत्मविश्वास काँग्रेसच्या पथ्यावर ! दोन माजी मंत्र्यांमध्ये थेट लढत
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
maharashtra assembly polls 2024 state economy in decline during bjp rule says chidambaram
भाजपच्या सत्ताकाळात महाराष्ट्राची पीछेहाट; माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची टीका
thane city BJP president JP Nadda, walk out of the Gurdwara
Video : …आणि गुरुद्वारातून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना काढता पाय घ्यावा लागला
dcm devendra fadnavis in loksatta loksamvad
मराठा समाज ८० टक्के हिंदुत्ववादी; महायुतीलाच पाठिंबा मिळेल!उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठाम विश्वास
dcm devendra fadnavis in loksatta loksamvad
लोकसभेतील अपयशानंतर ‘भारत जोडो’सारख्या शक्तींवर मात; विधानसभेत प्रभाव नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
Bhosari Constituency, Mahesh Landge, Ajit Gavhane,
भोसरीत दुरंगी; पण तुल्यबळ लढत

हेही वाचा >>>२००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोटाशी संबंधित खटला :जखमींविषयीच्या प्रश्नांवर प्रज्ञासिंह ठाकूर भावूक

मोदी यांच्या गेल्या नऊ वर्षांच्या कारकीर्दीत देश बदलला असून त्यांच्या नेतृत्वाचे जगभरात कौतुक झाले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेगाने विकास होत असून अनेक देश भारताच्या बाजूने उभे आहेत, असे फडणवीस यांनी नमूद केले.राहुल गांधी यांच्या इंडिया आघाडीशी आपली लढाईच नाही. मोदी यांचा विरोध करण्यासाठी ते एकत्र आले असून त्यांच्यातही अनेक वाद आहेत. त्यांच्यात एकही राष्ट्रीय नेता नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला.