अकरावीच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयांच्या ऑनलाइन प्रवेशाच्या रविवारी सायंकाळी जाहीर झालेल्या दुसऱ्या प्रवेश यादीची विज्ञान आणि वाणिज्य शाखेची किमान पात्रता गुणमर्यादा एक-दोन टक्क्यांनीच खाली आल्याने केवळ ५१ हजार १७६ विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.
बेटरमेंटच्या प्रतीक्षेत असलेले सुमारे ६३ हजार विद्यार्थी आणि प्रवेशाविना असलेले २५ हजार विद्यार्थी अशा सुमारे ८८ हजार विद्यार्थ्यांचे लक्ष दुसऱ्या यादीकडे लागले होते.
चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल या अपेक्षेवर दुसऱ्या यादीकडे डोळे लावून असलेल्या जवळपास ६६ हजार विद्यार्थ्यांपैकी सुमारे ५० टक्के म्हणजे ३४,४३६ विद्यार्थ्यांना बेटरमेंट मिळाले आहे, तर पहिल्या यादीत कुठेच प्रवेश न मिळालेल्या २५ हजार विद्यार्थ्यांपैकी १६,७४२ विद्यार्थ्यांना कुठे ना कुठे प्रवेश मिळवून देण्यात दुसऱ्या यादीला यश आले आहे; परंतु अजूनही ८४९१ विद्यार्थी प्रवेशाविना असून त्यांची सारी भिस्त तिसऱ्या यादीवर असणार आहे.
अनेक नामवंत महाविद्यालयांतील जागा दुसऱ्या यादीत भरल्याने बेटरमेंटच्या अपेक्षेवर असलेल्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या यादीतून अपेक्षित महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता मात्र फारच कमी आहे. दुसऱ्या यादीत कला शाखेची किमान पात्रता गुणमर्यादा मात्र अपेक्षेप्रमाणे ५ ते ७ टक्क्यांनी खाली आली आहे. दुसऱ्या यादीतील प्रवेश मुदत १ आणि २ जुलैला घ्यावे लागणार आहेत. सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना हे प्रवेश घेता येतील. तिसरी व शेवटची यादी ५ जुलैला जाहीर केली जाईल.
विज्ञान शाखा
महाविद्यालय दुसरी यादी पहिली यादी
साठय़े ५१२ ५२०
रुपारेल ५१३ ५१५
रुईया ५१० ५१३
पाटकर ५०२ ५०६
जयहिंद ४८४ ४९१
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा