आयुर्मान संपलेल्या आणि तरीही प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा-टॅक्सींवर कारवाई करण्याची परिवहन विभागाने तयारी केली असली तरी रिक्षा-टॅक्सी युनियनने त्याला विरोध केला आहे. सध्या रस्त्यावर असलेल्या रिक्षा-टॅक्सींची संख्या कमी असून ही कारवाई झाली तर आणखी किमान १० टक्के रिक्षा-टॅक्सी कमी होतील आणि प्रवाशांची गैरसोय होईल, असे युनियनचे म्हणणे आहे.
परिवहन विभागाने ऑगस्ट महिन्यात रिक्षांचे आयुर्मान १६ वर्षे तर टॅक्सींचे आयुर्मान २० वर्षे निश्चित केले आहे. त्यावरील रिक्षा-टॅक्सींना प्रवासी वाहतूक करण्यास मनाई करण्यात येईल असे परिवहन विभागाने जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात रस्त्यावरील अनेक रिक्षा-टॅक्सींचे आयुर्मान त्यापेक्षा जास्त असूनही त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही.

Story img Loader