मुंबई : अंमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या मुंबई विभागाने (एनसीबी) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी कारवाई करीत अवैध औषधी ड्रग्ज आणि बनावट सिगारेट जप्त केल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कारवाईत बेकायदेशीररित्या परदेशात पाठविल्या जात असलेल्या ७४,००० गोळ्या (२९.६ किलोग्रॅम) आणि २,४४,४०० बनावट सिगारेट जप्त करण्यात आल्या आहेत. या औषधांची किंमत सुमारे ७५ लाख रुपये आहे. हा माल अन्नपदार्थांमध्ये लपवून ठेवलेला अवैधरित्या लंडनला पाठविण्यात येत होता.

जप्त झालेला संपूर्ण माल हा कस्टम विभागाकडे जमा करण्यात आला असून आहे. तसेच दोन कुरिअर आणि उत्पादन वाहतूक करणाऱ्या कंपन्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. शुक्रवार, ३ जानेवारी आणि शनिवार, ४ जानेवारी दरम्यान ही कारवाई करण्यात आल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stock of illegal drugs cigarettes seized at airport mumbai news amy