मुंबई: उतारवयात अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतो तथापि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी ॲसिडीटी वा पोटासंबंधीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. कारण ही लक्षणे पोटाच्या कर्करोगाची असू शकतात. वजन कमी होणे किंवा रक्ताच्या उलट्या होणे या व्यतिरिक्त, आंबट ढेकर येणे आणि ओटीपोटात दुखणे यासाठी त्वरित वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असून वेळीच निदान झाल्यास त्याचे योग्य व्यवस्थापन करता येऊ शकते असे तज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

मुंबईत राहणारे ७० वर्षीय अशोक पाटील (नाव बदलले आहे) यांना अनेक महिन्यांपासून पोटदुखीचा त्रास होत होता. स्थानिक डॉक्टरांचा सल्ला घेतला असता त्यांना ॲसिडिटीचा त्रास असल्याचे निदान झाले. त्यासाठी औषध घेतल्यानंतर रुग्णास काही काळ बरे वाटले. पण, पुन्हा त्रास सुरू झाला आणि त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर उपचारासाठी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल केले. रुग्णाची हिमोग्लोबिन पातळी कमी झाली होती. पुढील वैद्यकीय तपासणीनंतर रुग्णाला पोटाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. कर्करोग चौथ्या टप्प्यातील असल्याने उपचाराला मर्यादा होत्या.

nashik police
नाशिक: सिडकोत पोलीस संचलन
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Health Special Unsafe Environment and Mental Health Hldc
Health Special: असुरक्षित वातावरण आणि मानसिक स्वास्थ्य
Absence of doctors other staff at Aarey hospital beds Tribal patients suffering for treatment Mumbai print news
आरे रुग्णालय रुग्णशय्येवर डॉक्टर, अन्य कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती; आदिवासी रुग्णांची उपचारांसाठी पायपीट
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
chatura cesarean delivery
स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Sanjay raut Maharashtra unsafe
Sanjay Raut: “मोदी जेव्हा येतात, तेव्हा महाराष्ट्र असुरक्षित”, संजय राऊत यांची टीका

हेही वाचा : मुंबई : मूक-बधीर मुलीवर लैंगिक अत्याचार

पोटाच्या कर्करोगाची लक्षणे बहुतेक लोकांना माहीत नसल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जाते. कर्करोग तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात पोहोचल्यावर रुग्ण उपचारासाठी येतात. अशा अवस्थेत रुग्णांवर उपचार करणे हे एक मोठे आव्हान आहे कारण सुरुवातीच्या टप्प्यातील रोगाचे परिणाम प्रगत अवस्थेपेक्षा चांगले असतात. त्यामुळे पोटाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. बहुतेकवेळा पोटाच्या विकारांकडे रुग्ण गंभीरपणे पाहाताना दिसत नाही परिणामी भविष्यात गुंतागुंतीचा सामना करावा लागतो.

जठराचा कर्करोग, सामान्यतः पोटाचा कर्करोग म्हणून ओळखला जातो, जेव्हा पोटातील असामान्य पेशी अनियंत्रितपणे वाढतात तेव्हा हा कर्करोग उद्भवतो. तणाव, खाण्याच्या चूकीच्या सवयी, रोगाचा कौटुंबिक इतिहास, धूम्रपान, मद्यपान, लठ्ठपणा आणि जीवनशैलीतील बदल यासारखे घटक त्याच्या विकासात भूमिका बजावू शकतात. वयानुसार पोटाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. या स्थितीच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये भूक कमी होणे, मळमळ आणि उलट्या होणे, छातीत जळजळ, अपचन आणि वजन कमी होणे यांचा समावेश होतो. बहुतेक वेळा हिमोग्लोबिन कमी होते ज्यामुळे खुप अशक्तपणा येतो. या अशक्तपणाकडे देखील दुर्लक्ष केले जाते आणि ही एक वाढत्या वयामुळे उद्भवणारी समस्या म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. ज्येष्ठ नागरिकांनी आंबट ढेकर, अशक्तपणा आणि ओटीपोटातील वेदना व अस्वस्थता यांसारखी लक्षणे गांभीर्याने घ्यावीत कारण ते पोटाच्या कर्करोगाचे संकेत ठरतात. साठीपुढील व्यक्तींनी याकडे दुर्लक्ष करु नका. हे लक्षात घेणे गरजेचे आहे की पोटाचा कर्करोग तरुणांना देखील प्रभावित करू शकतो. चाळीशीच्या वर्षांच्या तरुणांमध्ये पोटाच्या कर्करोगासारख्या समस्येत तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. अंदाजे चाळीस टक्के रुग्ण योग्य उपचार आणि प्रतिबंधात्मक धोरणांचे पालन करत नाहीत असे लीलावती रूग्णालयातील कर्करोग तज्ज्ञ डॉ. दिपक छाबरा यांनी सांगितले.

हेही वाचा : रखडलेले सात प्रकल्प लवकरच मार्गी, पाच प्रकल्पांतील भूसंपादन प्रक्रियेला वेग

जेव्हा पोटाच्या कर्करोगावर उपचार करण्याचा विचार येतो तेव्हा रुग्णाला शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि काहीवेळा रेडिएशन यांसारख्या बहुविद्याशाखीय पद्धतीची शिफारस केली जाते. ट्यूमरच्या स्टेज आणि स्थानाच्या आधारावर डॉक्टर रुग्णाच्या उपचार पद्धतीचा निर्णय घेतील.चांगल्या आरोग्यासाठी आपल्या रोजच्या आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करा. प्रक्रिया केलेले आणि फ्रोजन फुडचे सेवन टाळा, वजन नियंत्रित राखा आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहून आणि धूम्रपान आणि मद्यपान टाळा पोटाच्या कर्करोगाचे वेळेवर निदान झाल्यास तो बरा होऊ शकतो असेही डॉ छाबरा म्हणाले.