पनवेल-ठाणे रेल्वेमार्गावर ऐरोलीजवळ एका भल्या मोठय़ा दगडाने लोकल रोखली. दुपारी एक वाजून ५६ मिनिटांनी पनवेलहून ठाण्यासाठी सुटलेली लोकल दुपारी दोन वाजून ४१ मिनिटांनी ऐरोली स्थानकात पोहचताना हा प्रकार घडला. स्थानकाच्या अलीकडे ५० मीटर अंतरावर हा दगड रुळांखाली आला. सुदैवाने गाडी थांबविण्यात मोटरमनला यश आले. मात्र अचानक गाडी थांबल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाली.
सुरुवातीच्या महिलांच्या डब्याखाली हा दगड आल्याने पाच मिनिटांसाठी येथे लोकल थांबविली होती. या दगडामुळे रुळावरून रेल्वे घसरण्याची शक्यता होती. मात्र मोटरमनने प्रसंगावधान राखून गाडी थांबविली. हा दगड काही वेळाने रूळांवरून हटविण्यात आला. त्यानंतरच या लोकलचा पुढील प्रवास सुरू झाला.
मोटरमनच्या सतर्कतेमुळे सोमवारी ऐरोली येथील मोठी जीवितहानी टळल्याने प्रवाशांनी मोटारमनचे कौतुक केले. हा दगड येथे आला कसा? याचीच चर्चा प्रवाशांमध्ये रंगली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा