मुंबई : ईशान्य मुंबईचे भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचारावेळी आज्ञात इसमाने त्यांच्या प्रचार रथावर दगडफेक केल्याची घटना सोमवारी रात्री गोवंडी परिसरात घडली. याबाबत त्यांच्या कार्यकर्त्यांनी देवनार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ईशान्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार आमदार मिहीर कोटेचा यांनी त्यांच्या मतदार संघात जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यानुसार सोमवारी रात्री त्यांचा प्रचार गोवंडी परिसरात सुरू असताना अचानक एक दगड प्रचारातील रथावर येऊन पडला. हा दगड एका महिला कार्यकर्त्याला लागल्याचा आरोप यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. घटनेनंतर कार्यकर्त्यांनी देवनार पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा…बुलेट ट्रेनच्या डेपोमध्ये सौरऊर्जेचा वापर करणार; ठाणे, साबरमतीमध्ये अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पाची उभारणी

पोलिसांनी देखील या घटनेला दुजोरा दिला असून याबाबत तपास करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त हेमराजसिंग राजपूत यांनी दिली आहे.