भगवानगडाच्या गादीआडून सुरू असलेले भाजपचे राजकारण थांबविले नाही, तर जनआंदोलन करण्याचा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला आहे. गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री हे ‘न्यायाचार्य’ आहेत, त्यांनीच पोलिसांकडे तक्रार करण्यापेक्षा योग्य न्याय करण्याची अपेक्षा असल्याचे मुंडे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. महंतांना राजकारण करायचे असेल, तर त्यांनी पवित्र गादी सोडून राजकारणात यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भगवानबाबांच्या समाधीच्या सुवर्ण महोत्सव सांगतेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री नुकतेच तेथे गेले होते. त्याच्या आदल्या दिवशी धनंजय मुंडेही भगवानगडावर दर्शनासाठी गेले असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दगडफेकीबाबत पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर मुंडे समर्थकांकडून धमक्या येत असल्याचीही तक्रार आहे. आपण लोकांना आवरले नसते, तर धनंजय मुंडे त्या दिवशी गडावरून जिवंत परत गेले नसते, असे वक्तव्य नामदेव शास्त्री यांनी केले आहे. या वादामुळे सध्या मराठवाडय़ात वातावरण तापले आहे. मुंडे यांनी भगवानगडावर आपली श्रद्धा असल्याचे सांगितले. मला विरोधी पक्षनेतेपद मिळाल्याने आणि त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार झाल्यावरही मी दर्शनाला गेलो होतो. दर्शनासाठी आलेल्या भक्तांवर महंतांनी अन्याय करणे शोभत नसल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा