मुंबई वाहतूक पोलिसांनी गुरुवार, ९ जूनपासून शहरात हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या, मागील महिन्यापासून चालकासह दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्तीच्या आदेशाचा पाठपुरावा म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

पोलिस उपायुक्त (वाहतूक) राजतिलक रोशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील हेल्मेट नसणाऱ्या दुचाकीस्वारांवर कडक कारवाई करण्यासाठी सुमारे ५० वाहतूक पोलिस चौक्या सतर्क राहतील. ”गुरुवारपासून मुंबईतील हेल्मेट नसणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात येईल. त्यांचा परवाना ३ महिन्यांसाठी निलंबित करण्यात येईल, तसेच त्यांना ५०० रुपये दंड भरावा लागेल. सर्व ५० वाहतूक चौक्यांना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे,” ते म्हणाले.

Crime case against the couple, couple pushed traffic police, traffic police,
वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा, कारवाई टाळण्यासाठी बनावट वाहन क्रमांकाची पाटी
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
motorist, police dragged, barricade, police,
मोटार तपासण्यासाठी थांबविण्यास सांगितल्याने पोलिसाला बॅरिकेटसह २० फुटापर्यंत फरफटत नेले; वाचा कुठे घडली ही घटना
ठाणे : पोलिसांकडून आता ड्रोनद्वारे पाहाणी
pune officers without helmet no entry
पुणे: सावधान ! महापालिकेच्या इमारतीमध्ये हेल्मेट शिवाय प्रवेश कराल तर…!
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
Supreme Court on bulldozer action (1)
अतिक्रमणविरोधी कारवाईवेळी ‘हे’ नियम पाळा, थेट सर्वोच्च न्यायालयानंच घालून दिली नियमावली!

दरम्यान, कालपासून मुंबई वाहतूक पोलिसांनी या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली असून, काल पहिल्याच दिवशी ६२७१ जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी आपल्या ट्विटर पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. यामध्ये २३३४ दुचाकी चालक, ३४२१ पिलियन रायडर्स, ५१६ दोन्ही दुचाकीस्वार असे मिळून एकूण ६२७१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यासंबंधीची एक पोस्ट मुंबई वाहतूक पोलिसांनी आपल्या ट्विटरवर पोस्ट केली आहे.

‘मुंबईकर + सुरक्षा = आनंदी जीवन!’; मुंबई पोलिसांचा हटके रील तुम्ही पाहिला का?

या पोस्टच्या माध्यमातून पोलिसांनी मुंबईकरांना कठोर शब्दात सूचनाही केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय, ‘बाईकर्स लक्ष द्या! दुचाकीस्वार आणि हेल्मेट न पिलियन रायडर्सना मोटार वाहन कायद्यांतर्गत गंभीर दंडाला सामोरे जावे लागेल. तुमच्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी, तुम्ही नियमांचे पालन करत असल्याची खात्री करा.”

दंडाबद्दल बोलताना पोलीस उपायुक्त (वाहतूक) म्हणाले, “नियमांचे उल्लंघन केल्यास ३ महिन्यांसाठी परवाना निलंबित केला जाईल आणि ५०० ​​रुपये दंड आकारला जाईल”. ते पुढे म्हणाले की, “वाहतूक पोलिस चलानही देतील आणि लोकांना कायद्याचे पालन करण्यास सांगतील.”

‘मौका भी हैं… कानून भी!’ मुंबई पोलिसांचा भन्नाट रिप्लाय पाहून नेटकरी झाले चकित

मुंबई वाहतूक पोलिसांनी २५ मे रोजी एक अधिसूचना जारी करून दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट अनिवार्य केले होते आणि आदेशांचे पालन करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती. या अधिसूचनेत म्हटले आहे की, हेल्मेटशिवाय वाहन चालवताना आढळल्यास ५०० रुपये दंड भरावा लागेल किंवा ३ महिन्यांसाठी वाहन परवाना निलंबित करण्यात येईल.

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सोमवारी मुंबईकरांना हेल्मेटबाबतच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आणि उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही दिला होता. यापूर्वी, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी रस्त्याच्या दुतर्फा वाहन चालवणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.