मुंबई : गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. गणेशोत्सव आणि ईद – ए – मिलाद एकत्र असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहे. धार्मिक तेढ, जातीय सलोखा बिघडवणारे, बेकायदा शस्त्रांद्वारे गुन्हे करणारे, महिलांविरोधात गुन्ह्यांत सहभागी सराईत आरोपी, मोबाइल चोर, पाकिटमार यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.

गणेशोत्सव काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा आणि संवेदनशील ठिकाणी साध्या वेशातील पोलिसांच्या गस्तीसोबतच सीसीटीव्ही कॅमेरे, वॉच टॉवरच्या सहाय्याने करडी नजर ठेवण्यात येणार आहे. शहरात ३२ उपायुक्त, ४५ सहाय्यक पोलीस आयुक्तांसह २४३५ पोलीस अधिकारी व १२ हजार ४२० कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणारआहेत. याशिवाय राज्य राखीव पोलीस दल, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, डेल्टा, कॉम्बॅक्ट, तसेच गृहरक्षक दल यांनाही महत्त्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय मेटल डिटेक्टर, श्वान पथक, बाॅम्ब शोधक व नाशक पथकांच्या माध्यमातूनही महत्त्वाच्या ठिकाणी नियमित तपासणी करण्यात येणार आहे.

Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
makarand deshpande starrer movie pani puri
आहे चटकदार पण…
airoli vidhan sabha marathi news
ऐरोलीतील बंडोबांना शिंदे सेनेचे अभय ?
cases have been registered by the police against those selling food on handcarts by blocking roads and footpaths In Kalyan
कल्याणमध्ये रस्ते, पदपथ अडवून हातगाडीवर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हे
Heavy police presence on the occasion of Prime Minister narendra modis visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त
Heritage walk for voting awareness with the help of Municipal Corporation Mumbai print news
मतदानाच्या जनजागृतीसाठी ‘हेरिटेज वॉक’, महापालिकेचा संस्थेच्या मदतीने अनोखा उपक्रम

हेही वाचा – गणेशोत्सव मंडळाच्या स्वयंसेवकांना ‘सीपीआर’ प्रशिक्षण

छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलीस तैनात असणार आहेत. त्याचबरोबर शहरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष ठेवण्यात येणार असून महत्त्वाच्या स्थानिक मंडळांना पोलीस दिवसाकाठी तीन ते चार वेळा भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणार आहेत. तसेच गणेशोत्सव मंडळांनाही मंडप परिसरात सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी अल्पवयीन मुले व महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथकाला विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय पोलिसांना अनेक स्वयंसेवी संस्थांकडूनही मदत मिळणार आहे.

धार्मिक मिरवणुका एकमेकांसमोर येणार नाहीत याची काळजी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर धार्मिक संस्थांशी निगडीत व्यक्तींची बैठक आयोजन करून सलोखा निर्माण करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सर्व पोलीस ठाण्यांना सांगण्यात आले आहे. आक्षेपार्ह देखाव्यांवर विशेष लक्ष ठेवण्याची, मिरवणुकीच्या वेळी आक्षेपार्ह गाणी, नाच यावरही लक्ष ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच इतर धार्मिक स्थळांजवळ मिरवणूक रेंगाळणार नाहीत यादृष्टीनेही उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून दोन वर्षांत ३२१ कोटींची आर्थिक मदत!

ध्वनी प्रदूषण नियमांचेही उल्लंघन होणार नाही, याकडे सर्व पोलिसांना वरिष्ठांकडून सूचना करण्यात आल्या आहेत. जुगार, अमली पदार्थ विक्रेते, शस्त्र विक्रेते, दारू विक्रेते यांच्याविरोधात कडक कारवाई करावी. विशाळगड येथील घटना, तसेच बांगलादेश येथील स्थिती या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर विशेष दक्षता घ्यावी. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अतिमहत्त्वाच्या व्यक्ती मोठ्या प्रमाणात गणेश मंडळांना भेट देण्याची शक्यता असल्यामुळे तेथे बंदोबस्त ठेवण्यासही सर्व पोलीस ठाण्यांना सांगण्यात आले आहे.