मुंबई : नायर रुग्णालयामध्ये कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सोमवारी अचानक काम बंद आंदोलन पुकारले. कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचे नियमितीकरण करणे, समान काम समान वेतन त्याचबरोबर सातवा वेतन आयोग, दिवाळी बोनस आदी विविध मागण्यांसाठी सोमवारी काम बंद आंदोलन केले.

नायर रुग्णालयामध्ये मागील अनेक वर्षांपासून सात सहाय्यक वैद्यकीय अधिकारी (एएमओ) कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. या वैद्यकीय अधिकाऱ्यांना अनेक सोयी-सुविधा मिळत नसल्याने त्यांना विविध त्रासाला सामोरे जावे लागते. या समस्येकडे रुग्णालय प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी काम बंद आंदोलन केले. यावेळी त्यांनी दोन वर्षांपासून अधिक काळ कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करावे, २०१६ पासून आतापर्यंत थकबाकीसह सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करून दिवाळी बोनस द्यावा, केईएम, शीव व नायर या तिन्ही रुग्णालयांमधील सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवांमध्ये एकसमानता आणण्याबरोबरच त्यांना समान वेतन द्यावे, अपघाती वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) यांच्यासाठी निवासाची व्यवस्था करावी, अयोग्य वातावरण, कामाचा अतिरिक्त ताण, कार्यालयासाठी अपुरी जागा, स्वतंत्र स्वच्छतागृहाचा अभाव, तसेच प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला वेतन बँक खात्यामध्ये जमा व्हावे या मागण्यांसाठी नायर रुग्णालयातील सात सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सोमवारी काम बंद आंदोलन पुकारले होते.

combing operation parabhani
Parbhani : परभणीत रात्री पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन? पोलीस म्हणाले, “परिस्थिती नियंत्रणात आणताना…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
police action on massage parlour misbehavior is going on in name of massage parlour
मसाज पार्लरच्या नावाखाली गैरप्रकारांवर कारवाईचा बडगा, वर्षभरात पोलिसांकडून ३३ गुन्हे दाखल
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
BJP leaders vikasrao dube son amol dube kidnapped from Parli ransom of Rs 2 crore demanded
परळीतून भाजप नेत्याच्या मुलाचे अपहरण; दोन कोटींच्या खंडणीची मागणी
bus station in Kurla, commuters problem Kurla,
कुर्ल्यातील बस स्थानक बंद केल्याने प्रवाशांना पायपीट
Satara , development work Satara, code of conduct Satara, Satara latest news,
आचारसंहिता संपल्याने साताऱ्यात दीडशे कोटींच्या विकासकामांना प्रारंभ
pune pmc On first day of Sarvankash Swachhta 24 tons of garbage and billboards removed
महापालिका आयुक्तांचा आदेश आणि पहिल्याच दिवशी झाले इतके काम ! महापालिकेची सर्वंकष स्वच्छता मोहीम, १६ टन राडारोडा, २४ टन कचराही उचलला

हेही वाचा – दाऊदवरील विष प्रयोगाचे वृत्त अफवा, गेल्या आठवड्यात दाऊद तपासणीसाठी रुग्णालयात

हेही वाचा – मुंबई : सांताक्रुझमध्ये हॉटेलला आग

यामुळे अत्यावश्यक विभागामधील काम ठप्प होऊ नये यासाठी रुग्णालय प्रशासनाने तातडीने सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागी निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या आंदोलनाचा आरोग्य सेवेवर फारसा परिणाम झाला नसल्याची माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांनी दिली.

Story img Loader