परीक्षा सुरू असताना शिक्षकांनी कॉपी करताना पकडल्यानंतर नैराश्य आलेल्या १६ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा गंभीर प्रकार चेंबूर परिसरात घडला. मुलीला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चेंबूर कॅम्प येथील इंदिरा नगर परिसरात १६ वर्षीय मुलगी कुटुंबीयांसोबत राहात होती. ती इयत्ता नववीत शिकत होती. मुलीची परीक्षा सुरू होती. परीक्षा सुरू असताना मंगळवारी शिक्षकांना मुलीजवळ कॉपी सापडली. शिक्षकांनी मुलीच्या आईला शाळेत बोलावले आणि घडलेल्या प्रकार त्यांच्या कानावर घातला. या प्रकारामुळे नैराश्य आलेल्या मुलीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर तात्काळ तिला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर कुटुंबियांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. अखेर याप्रकरणाची चेंबूर पोलिसांना माहिती देण्यात आली. चेंबूर पोलिसांंनी प्राथमिक माहिती घेऊन याप्रकरणी अपमृत्यूची नोंद केली. मुलीच्या मृत्युमुळे कुटुंबीय सध्या बोलण्याच्या मन:स्थितीत नाहीत. मात्र लवकरच त्यांचा सविस्तर जबाब नोंदवण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक तपासात कोणताही घातपात आढळला नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.