भरधाव वेगाने जाणाऱ्या शाळा बसने दिलेल्या धडकेत एका १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. फिरोज खान असे या मृत मुलाचे नाव आहे. जोगेश्वरीच्या आनंद नगर येथे बुधवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. गोरेगावच्या जीएम इंटरनॅशनल शाळेचा बसचालक दीपक गुरव (५२) हा शाळेची बस घेऊन जोगेश्वरी येथून जात होता. त्यावेळी जोगेश्वरी पश्चिमेच्या आनंद नगर येथील आशियाना टॉवरसमोरून फिरोज रस्ता ओलांडत होता. मात्र, भरधाव वेगाने जाणाऱ्या बसची धडक लागून तो जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तेथे फिरोजचा मृत्यू झाला. बसचालक गुरव याला अटक केल्याची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष वेळे यांनी दिली.

Story img Loader