मुंबई : राज्य शासनाने दिलेल्या पत्रातील निर्देशानुसार आणि त्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाने व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत विद्यापीठाने अचानकपणे गुरुवारी रात्री उशीरा परिपत्रक काढल्यामुळे मुंबईच्या राजकीय वर्तुळातील वातावरण तापू लागले आहे. ठाकरे गटाच्या युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई, माजी अधिसभा सदस्य आणि पदाधिकारी तसेच छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलाच्या प्रवेशद्वारावर दाखल झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> क्षयरोगावरील औषधांच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे हाल, औषध खरेदीसाठी रुग्णांच्या नातेवाईकांच्या खिशाला खार

दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू, प्र – कुलगुरू, कुलसचिवांची भेट घ्यायची आहे आणि त्यांना निवडणूक स्थगिती करण्यामागचा जाब विचारायचा आहे. तर आदित्य ठाकरे यांनी लिहिलेले पत्र युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. मात्र फोर्ट संकुलाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले असून कोणालाही आतमध्ये सोडले जात नसल्यामुळे फोर्ट संकुलाच्या प्रवेशद्वारावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अधिकारी व पोलिसांशी चर्चा केल्यानंतर वरुण सरदेसाई आणि युवा सेनेच्या तसेच छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना फोर्ट संकुलात सोडण्यात आले. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीला स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या उमेदवारांनी फोर्ट संकुलाच्या प्रवेशद्वारावर उभे राहून आपले नामनिर्देशन अर्ज फाडून टाकले. छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे राज्याध्यक्ष रोहित ढाले म्हणाले की, ‘भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाच्या विद्यार्थी व युवा आघाडीची कोणत्याही प्रकारची तयारी अधिसभा निवडणुकीसाठी झाली नव्हती. त्यामुळे राज्य सरकारने भयभीत होऊन मुंबई विद्यापीठाला हाताशी धरून अधिसभा निवडणुकीला स्थगिती दिली’.