कांदिवली येथील लालजीपाडा येथे इयत्ता पाचवीत शिकत असलेल्या श्रवण शेट्टी याने गुरुवारी सकाळी आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे कांदिवली परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. श्रवण हा आई आणि बहिणीसह राहात होता. आई कामावर आणि बहिण शिकवणीला गेल्यानंतर त्याने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप उघड झालेले नाही. श्रवणचे आजोबा आणि वडिलांनीही यापूर्वी गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे आसपासच्या नागरिकांकडून सांगण्यात आले.

Story img Loader