सलग तिसऱ्या वर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसवरील बंदी आदेशाची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरलेल्या मुंबई महानगरपालिकेने यंद आपल्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या श्री गणेशमूर्ती मातीकाम कार्यशाळेत सहभागी झालेल्या ३६० विद्यार्थांनी शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती घडवून पर्यावरणस्नेही मूर्ती साकारण्याचा संदेश दिला. उत्कृष्ट मूर्ती घडविणाऱ्या सात विद्यार्थ्यांचा लवकरच सत्कार करण्यात येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाअंतर्गत असलेल्या संगीत व कला अकादमीतर्फे दरवर्षी श्री गणेशमूर्ती मातीकाम विद्यार्थी कार्याशाळेचे आयोजन करण्यात येत होते. मात्र करोनाकाळात या कार्याशाळेत खंड पडला होता. करोनाविषयक निर्बंध हटविण्यात आल्यामुळे यंदा या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यंदा सहा केंद्रांमध्ये ही कार्यशाळा पार पडली.
हेही वाचा : एसटीतील २१५ महिला चालक-वाहकांच्या भरतीला स्थगिती कायम ; सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा
पश्चिम उपनगरांतील कांदिवली (पश्चिम), अंधेरी (पूर्व), पूर्व उपनगरांतील घाटकोपर, कुर्ला आणि शहर विभागातील फोर्ट आणि लोअर परळ येथील मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये २५ ऑगस्ट रोजी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत एकूण ३६० विद्यार्थी सहभागी झाले होते. सहा केंद्रांवरील प्रत्येकी पाच याप्रमाणे ३० विद्यार्थ्यांची मध्यवर्ती स्तर स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. त्यानंतर लोअर परळ येथील ना. म. जोशी मार्ग महानगरपालिका शाळेमध्ये २६ ऑगस्ट रोजी मध्यवर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी आपल्या संकल्पनेतून शाडूच्या मातीपासून विविध रूपातील गणेशमूर्ती साकारल्या.
शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती साकारून पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा संदेश या बाल मूर्तीकारांनी पर्यावरण दूत बनून दिला. सुप्रसिद्ध मूर्तिकार उदय डावल यांनी कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांपैकी उत्कृष्ट सात बाल मूर्तिकारांची निवड केली. अंतिम विजेत्या ठरलेल्या या बाल मूर्तीकारांना लवकरच सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. केंद्र स्तर व मध्यवर्ती स्तरावर सहभागी झालेल्या बालमूर्तीकारांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी राजू तडवी, उपशिक्षणाधिकारी (मध्यवर्ती) सुजाता खरे, उपशिक्षणाधिकारी (शहर) कीर्तीवर्धन किरतकुडवे, अधीक्षिका (शाळा) सायली सुर्वे, प्रशासकीय अधिकारी (शाळा) तनुजा उघाडे व इतर मान्यवरांनी कार्यशाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. कला प्राचार्य दिनकर पवार व कला निदेशक मंजिरी राऊत, भूषण उदगीरकर, योगेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व केंद्रप्रमुख, उपकेंद्रप्रमुख व कलाशिक्षकांनी या कार्यशाळांचे संयोजन केले.
हेही वाचा : बाजारात उत्सवऊर्जा ; करोनानंतरच्या भीतीमुक्त वातावरणात गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी झुंबड
विजेत्यांची नावे –
प्रथम पारितोषिक – अक्षरा अजय वर्मा (वरळी सी फेस महानगरपालिका इंग्रजी शाळा)
द्वितीय पारितोषिक – रागणी चंद्रमोहन जैसवार (धारावी एमपीएस काळा किल्ला महानगरपालिका शाळा)
तृतीय पारितोषिक – ज्योती जयराम महतो (न्यू वर्सोवा हिंदी महानगरपालिका शाळा)
उत्तेजनार्थ पारितोषिक – वेदांत विलास सोनवणे (वरळी सी फेस महानगरपालिका इंग्रजी शाळा)
आर्यन अरुण गिरी (हनुमान नगर महानगरपालिका हिंदी शाळा)
रिया राजेश यादव (हनुमान नगर महानगरपालिका हिंदी शाळा)
शुभम लालबहादूर बिंद (तिरंदाज व्हिलेज महानगरपालिका हिंदी शाळा)