मुंबई : ‘लव्ह जिहाद’ संदर्भात अन्य राज्यांकडून करण्यात आलेल्या कायद्यांचा अभ्यास सुरु असून राज्यातही या संदर्भात कायदा करण्याची बाब विचाराधीन आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले. मुलींना फूस लावून पळवून नेणे, धर्मातर करुन लग्न करणे आदी तक्रारींबाबत पोलिसांनी कशापध्दतीने कारवाई करावी, यासाठी महासंचालकांकडून सर्व पोलिस ठाण्यांना मार्गदर्शक तत्वे व कार्यप्रणाली जारी केली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. छत्रपती संभाजीनगर मधील फुलंब्री येथील धर्मातराच्या घटनेबाबत हरिभाऊ बागडे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यावर याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येईल, असे फडणवीस यांनी नमूद केले.
प्रत्येक जिल्ह्यात ‘हिमोफिलिया’ उपचार केंद्र
‘हिमोफिलिया’ हा अनुवंशिक रक्तदोषामुळे होणारा आजार आहे. या आजाराच्या रूग्णांच्या तपास, निदान व उपचारासाठी राज्यात नऊ ठिकाणी केंद्र असून येत्या काळात प्रत्येक जिल्ह्यात हे केंद्र सुरू करण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.