२२ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून चेंबूर पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरिक्षकाला आरसीएफ पोलिसांनी गुरुवारी अटक केली. सचिन दाभोळकर (३२) असे या पोलिसाचे नाव आहे.
दाभोळकर याने फिर्यादी तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारिरिक संबंध ठेवले होते. मात्र त्याने नंतर लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे या तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन सचिनविरोधात बलात्काराची तक्रार नोंदवली. संबंधित तरुणीचा वैद्यकीय अहवाल आणि भ्रमणध्वनीवरील फोनकॉल्स नोंदींचा तपशील मागविण्यात आलेला आहे. तसेच ‘त्या’ तरुणीने केलेल्या तक्रारीचीही खातरजमा करण्यात येत असून ती झाल्याखेरीज आरोपीविरुद्ध खातेनिहाय चौकशी केली जाणार नाही, असेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.  ही तरुणी ‘सेल्स गर्ल’ म्हणून काम करत असून तिचा भ्रमणध्वनी हरवल्याप्रकरणी ती तक्रार दाखल करण्यासाठी चेंबूर पोलीस ठाण्यात गेली होती. दाभोळकर याने तिचा हरवलेला भ्रमणध्वनी शोधून परत केला आणि तेव्हापासून ते एकमेकांच्या संपर्कात होते. सचनिने  आपल्यावर सात वेळा बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे.

Story img Loader