मुंबई : सत्तरच्या दशकात दिग्दर्शकीय पदार्पणातच ‘कालीचरण’सारखा यशस्वी चित्रपट देणाऱ्या शोमन सुभाष घई यांनी त्यानंतरही दिग्दर्शक म्हणून तब्बल ११ यशस्वी चित्रपट दिले. ‘विधाता’, ‘हीरो’, ‘राम लखन’, ‘सौदागर’, ‘खलनायक’, ‘ताल’, ‘परदेस’सारखे यशस्वी चित्रपट देणाऱ्या सुभाष घई यांनी आपल्या चित्रपटांमध्ये, त्यातील व्यक्तिरेखांमध्ये भारतीयत्व होते म्हणून त्या दीर्घकाळ रसिकांच्या मनात गुंजत राहिल्या आणि यशस्वी ठरल्या, अशा शब्दांत आपल्या यशामागचे इंगित उलगडले.

‘कर्माज चाईल्ड : द स्टोरी ऑफ इंडियन सिनेमाज अल्टिमेट शोमॅन’ या सुभाष घई यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन प्रसिध्द कवी गुलजार यांच्या हस्ते शुक्रवारी एनसीपीए येथे सुरू असलेल्या ‘लिटरेचर लाईव्ह फेस्टिव्हल’मध्ये करण्यात आले. यानिमित्ताने, ‘द ग्रेटेस्ट शोमन’ हा घई यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रसिध्द दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी या कार्यक्रमात सुभाष घई यांना त्यांच्या लहानपणीच्या आठवणींपासून ते चित्रपट क्षेत्रातील त्यांचे मार्गदर्शक, त्यांच्या चित्रपटातील विषय-संकल्पना, नायिकांचे सौंदर्य अशा विविध विषयांवर बोलते केले.

Tula Shikvin Changlach Dhada
Video: “सूनबाई जर…”, भुवनेश्वरीमुळे अधिपतीला भेटण्याची अक्षराची इच्छा अपूर्ण राहणार का? मालिकेत पुढे काय घडणार?
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
premachi goshta 2
मराठी चित्रपट ‘प्रेमाची गोष्ट २’ची रिलीज डेट ठरली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
tharla tar mag monika dabade baby shower ceremony
‘ठरलं तर मग’च्या सेटवर मोनिकाचं डोहाळेजेवण; मालिकेतील सर्व अभिनेत्री ऑफस्क्रीन आल्या एकत्र, पती उखाणा घेत म्हणाला…
Shiva
Video : “तू दे होकार, मला तेच…”, आशूची नाराजी दूर करण्याची शिवाची हटके स्टाईल; मालिकेत पुढे काय होणार?
Ya goshtila Navach Nahi , cinema , pune ,
चंदेरी पडदा आणि गडद काळा अंधार
Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार

हेही वाचा : Mumbai Airport International Passengers: मुंबई विमानतळावरून १२ लाख प्रवाशांची आंतरराष्ट्रीय वारी

‘आपण भारतात राहतो, इथला अगदी आधुनिक किंवा बंडखोर विचारांची कास धरू पाहणारा १० टक्के तरुण वर्ग सोडला तर ९० टक्के प्रेक्षक भारतीयच आहेत, याचे भान चित्रपट करताना असले पाहिजे’ असा सल्ला सुरुवातीच्या काळात सहाय्यक लेखक म्हणून काम करत असताना एका प्रसिध्द निर्मात्याने दिला होता. तो अनुसरून आजवर सगळे चित्रपट केले, असे सांगतानाच सध्याच्या हिंदी चित्रपटात आधुनिकतेच्या नावाखाली व्यक्तिरेखांचे संवाद, त्यांचे राहणीमान या सगळ्या गोष्टी इंग्रजी वळणाच्या दाखवल्या जातात. प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या तरुणपणात विचारांनी आधुनिकच असतो. मी अठरा वर्षांचा होतो तेव्हा त्या काळाच्या अनुषंगाने मी आधुनिकतेचा पुरस्कार करणारा होतो. त्यामुळे अशी एखादी व्यक्तिरेखा चित्रपटात असू शकते, पण संपूर्ण चित्रपटाला इंग्रजी वळणाची धाटणी देणे योग्य नाही, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा : मुंबई: मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक

चित्रपटांच्या यशात गीतकार आनंद बक्षी यांचे लक्षणीय योगदान

माझे चित्रपट यशस्वी ठरण्यात गीतकार आनंद बक्षी यांचे मोलाचे योगदान होते, असे त्यांनी प्रांजळपणे नमूद केले. चित्रपटातील पात्रांचा आंतरिक प्रवास आणि कथेतून आपल्याला काय सांगायचे आहे याबद्दलची स्पष्टता लिखाणापासून दिग्दर्शकीय मांडणीपर्यंत सगळ्यात असली पाहिजे. ते भान मी माझ्या चित्रपटातून जपले म्हणून ते यशस्वी ठरले, हे सांगतानाच गीतकार आनंद बक्षी यांच्या गाण्यांमुळे आपल्या चित्रपटांचे आयुष्य वाढले, असेही त्यांनी सांगितले. ‘सौदागर’ चित्रपटातील शीर्षकगीताचे वानगीदाखल उदाहरण देताना त्यांनी त्या गाण्याच्या निर्मितीचा रंजक किस्सा सांगितला. दिल्लीत बक्षी यांच्या मुलीच्या लग्नात जेवून झाल्यावर हात धुत असताना त्यांची आणि सुभाष घईंची भेट झाली. त्यावेळी नव्या चित्रपटाचे शीर्षक ‘सौदागर’ हे असल्याची माहिती बक्षी यांना देताच त्यांनी ‘सौदागर सौदा कर… दिल लेले… दिल देकर’ ही ओळ घई यांना ऐकवली. चित्रपटाच्या कथेचे सार गाण्याच्या मुखड्यातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे कसब असलेल्या आनंद बक्षी यांच्यासारख्या प्रतिभावंत गीतकारामुळे चित्रपटांच्या यशात अधिक भर पडल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : तारीख वीस, आमदार फिक्स ….उमेदवारांच्या घोषवाक्य प्रतिभेला बहर

दिलीप कुमार यांचा प्रभाव

एखादी गोष्ट इतरांना कशी समजावून सांगायची या कौशल्यासह आईचे अनेक गुण आणि तिने शिकवलेल्या गोष्टींचा आयुष्यावर खूप प्रभाव पडला. आईनंतर अभिनेता दिलीप कुमार यांच्याकडून चित्रपटांविषयी, विविध व्यक्तींना कसे समजून घ्यायचे याविषयी शिकता आले, असे घई यांनी सांगितले.

Story img Loader