इचलकरंजीसारख्या छोटय़ा शहरात शिकून आपल्या अलौकिक गणितीय बुद्धीने जगभरात नाव कमाविलेले गणितज्ञ सुभाष खोत यांचा केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. चाकोरीबाहेर जाऊन संशोधक आणि जिज्ञासू वृत्ती जोपासली तर मोठी भरारी मारता येते हे सामान्य कुटुंबातून आलेल्या खोत यांनी सिद्ध करून प्रतिभाशाली गणितज्ञ रामानुजन यांचा वारसा पुढे नेला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खोत यांचे अभिनंदन केले आहे. गणित क्षेत्रात देदिप्यमान कामगिरीसाठी देण्यात येणारा रोल्फ नेवान्लिन्ना पुरस्कार सुभाष खोत यांना जाहीर झाला. एका महाराष्ट्रीय संशोधकाने देशाचा झेंडा उंचावल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरून खोत यांचे अभिनंदन केले.
सुभाष खोत म्हणजे नव्या युगातले रामानुजन – मुख्यमंत्री
इचलकरंजीसारख्या छोटय़ा शहरात शिकून आपल्या अलौकिक गणितीय बुद्धीने जगभरात नाव कमाविलेले गणितज्ञ सुभाष खोत यांचा केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला अभिमान आहे.
First published on: 15-08-2014 at 03:58 IST
TOPICSसीएम चव्हाण
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subhash khot new era ramanujan cm chavan