अकरा फूट लांब आणि अकरा फूट रुंदीचे चार चौरस एकमेकांना जोडून सुबोध गुप्ता यांनी बनवलेलं शिल्प सध्या मुंबईत अवतरलं आहे! ते पाहण्यासाठी नेहमीच्या गॅलऱ्यांची वाट सोडून, महालक्ष्मीच्या ‘फेमस स्टुडिओ’मध्ये जावं लागेल.. फेमस स्टुडिओचा बसस्टॉप बऱ्याच जणांना माहीत असतो पण महालक्ष्मी स्थानकाहून चालत पाच मिनिटांवर असणाऱ्या या वास्तूत प्रत्यक्ष जाऊन आलेले कमी जण असतात. पण या निमित्तानं स्टुडिओ पाहाता येईल. इथं एकाच वास्तूत तीन स्टुडिओ आहेत, त्यापैकी सर्वात मागच्या, ‘स्टुडिओ क्रमांक एक’मध्ये हे प्रदर्शन सुरू आहे. त्यात गुप्ता यांच्याच अन्यही अनेक कलाकृती आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सुबोध गुप्ता यांच्या त्या ११ बाय ११ फुटी चौरस शिल्पाचा केवळ मोठा आकार, हे त्या कलाकृतीचं वैशिष्टय़ नव्हे. मग वैशिष्टय़ काय? ते बघूच, पण आधी गुप्ता यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊ. बिहारमध्ये, पाटण्यात चित्रकलेची पदवी घेतलेल्या गुप्ता यांनी ‘बिहारी’ या शिक्क्यासकटच चित्रकलेचं जग पादाक्रांत केलं. पाश्चात्त्य देशांतल्या कलावंतांइतकाच मान बिगरपाश्चात्त्य कलावंतांना मिळत नाही, ही स्थिती पालटवून टाकणाऱ्या नव्वदोत्तरी भारतीय कलावंतांपैकी सुबोध गुप्ता हे एक महत्त्वाचं नाव. ग्रामीणता, ‘बिहारी’पणा यांना कलाकृतींमध्ये स्थान देताना गुप्ता यांनी अचाट दृश्यांची मालिकाच रचली, असं त्यांचे टीकाकारही मान्य करतात. हा अचाटपणा किंवा ‘स्पेक्टॅक्युलर व्हिज्युअल्स’ हे गुप्ता यांच्या अभिव्यक्तीचं एक दृश्यवैशिष्टय़ ठरलं. पण अभिव्यक्ती केवळ तेवढय़ा वैशिष्टय़ात गुरफटली नाही. तिचे अनेक संदर्भ गुप्ता यांच्या कलाकृतींमध्ये दिसत राहिले, राहातात. उदाहरणार्थ, बिहारमधल्या अॅल्युमिनियमच्या खाणी, पोलादखाणी, त्यामुळे तिथं निघालेला भांडी बनवण्याचा उद्योग.. सर्वच लहान उद्योग पिचून निघत असताना याही उद्योगाचं पिचणं, हा एक संदर्भ; तर ती भांडी, मध्यमवर्गीय भारतीय घरांमधला त्या भांडय़ांचा वापर, काळानुरूप ती भांडी काळवंडून जाणं, हा दुसरा संदर्भ. हे दोन्ही संदर्भ ११बाय ११ फुटांच्या त्या ठोकळावजा शिल्पात आहेत.. त्या ठोकळय़ाच्या चारही बाह्य भिंती पिचक्या, वापरलेल्या, काळवंडलेल्या भांडय़ांनीच बनलेल्या आहेत.
या प्रदर्शनात आत्ता तो ठोकळाच दिसतो, पण पहिल्या दोन दिवशी विशिष्टय़ वेळी त्याच्या आत शिडीनं माणसं सोडली जायची. रोजंदारीवरली माणसं. मजूरच. बिहारी-बंगाली मजूर असतात तसले हे मजूर. ठोकळय़ाच्या आत. त्यांचं इथलं काम काय? तर ठोकळय़ाच्या भिंती सलग दिसाव्यात म्हणून आतून खोचून ठेवलेली रंगीबेरंगी फडकी-चिंध्या या मजुरांनी आतूनच उपसून काढायची. जी भोकं मोकळी होतील त्यातून बाहेर पाहायचं.. ‘आर्ट एग्झिबिशन’ला आलेल्या माणसांकडे रोखून पाहणारे त्या मजुरांचे डोळे; हा सुबोध गुप्तांच्या या कलाकृतीचाच भाग होता! तेच तिचं खरं वैशिष्टय़ होतं.
ही माणसं आता नाहीत, त्यामुळे अनुभव अर्धाच राहिल्यासारखं वाटेल.. तरीही, तो केवळ ठोकळा पाहायला जरूर जावं असं हे प्रदर्शन आहे. आतल्या दालनात शिरताच दारासमोरच स्टीलचा चकचकीत गोल दिसतो.. प्रचंड दहा फुटी आरशासारखा! तिथून आत गेल्यावर लक्षात येतं.. हीदेखील प्रचंड आकाराची दोन भांडीच आहेत आणि त्या दोहोंच्या मधला भाग प्रकाशमान आहे. जणू एखादय़ा अंडय़ाची दोन शकलं होताहेत आणि प्रकाश जन्मतो आहे.. या कलाकृतीचं नावही ‘बर्थ ऑफ अ स्टार’ असं आहे. गुप्ता यांच्या काही कलाकृतींमध्ये अमूर्ततेचा सूचक वापर आणि चमत्कृती दिसते, त्यापैकी ही कलाकृती आहे. ‘बर्थ ऑफ स्टार’ च्या सभोवताली स्टीलचेच सपाट आरशासारखे पत्रे दिसतात. मध्येच ते मोठ्ठा आवाज करत एकसाथ गदागदा हलू लागतात. आवाज थांबतो, तेव्हा ‘उत्पादन’/ निर्मिती यांच्या वेणांमधून बाहेर आल्याचा आनंद प्रेक्षकाला मिळतो.
याच प्रदर्शनातली आणखी एक – ‘क्रोध’ नावाची कलाकृती मात्र, तांत्रिक अडचणींमुळे बंद असून ती काही अनुभवच देत नाही. अन्य कलाकृतीसुद्धा आहेत, पण त्या इतक्या लक्षणीय ठरत नाहीत. ठोकळय़ाच्या सभोवताली प्रचंड मोठय़ा अॅल्युमिनियमच्या पत्र्यावरली चित्रं आहेत. त्यात समुद्रासारख्या- किंवा आकाशासारख्या- दिसणाऱ्या पाश्र्वभूमीवर एकेक भांडं पूर्ण चपटं करून लावलेलं आहे.. जणूकाही चंद्राचं प्रतिबिंब समुद्राच्या पाण्यावर पडलंय. याच कलाकृतीत विजा कडाडल्यासारख्या प्रकाशमान रेषा दिसतात. त्याहीनंतर पाठीमागच्या बाजूला एका लहान दालनात, स्टीलचे उंच प्याले (रूढ मराठीत – ‘ग्लास’! ) आणि चमचे-पळय़ा यांनी बनलेले चांदण्यांसारखे आकार असलेलं शिल्प आहे, भांडय़ांचीच- पुन्हा चंद्रासारखी दिसणारी- जलरंगातली चित्रं आहेत आणि त्या चित्रांवर जाड रासायनिक थर दिल्यामुळे ती जणू लाखेची दिसताहेत. पण या सर्व कलाकृतींमध्ये गुप्ता यांची अस्सल अभिव्यक्ती दिसण्यापेक्षा तिच्या आवृत्त्याच अधिक दिसतात. ठोकळा मात्र अस्सल ठरतो, तो या कलाकृतीच्या मूळ संकल्पनेत असलेल्या मानवी डोळय़ांमुळे!
राणीच्या बागेला वळसा..
भायखळय़ाच्या वीर जिजामाता उद्यानात- म्हणजेच राणीच्या बागेत बांधकाम सुरू असल्यानं मुख्य प्रवेशदार बंद आहे. खरं तर याच प्रवेशदारातून आत शिरल्याशिरल्या मुंबई महापालिकेचं ‘भाऊ दाजी लाड संग्रहालय’ आहे आणि तिथं मुंबईच्या इतिहासाची माहिती घेताघेताच आजकालच्या – ‘समकालीन कले’चा भाग असणाऱ्या- कलाकृतींचीही प्रदर्शनं दहा रुपयांच्या तिकिटात पाहण्याची सोय असते. पण प्रवेशदार बदलल्यानं राणीबागेच्या नाक्याला वळसा घालून, साताठ मिनिटं चालत आणि राणीबागेचंही पाच रुपयांचं तिकीट काढून मगच या संग्रहालयात पोहोचता येतं. तरीही इथं जावं, याची कारणं दोन- (१) दयानिता सिंग यांच्या भरपूर फोटो-कलाकृती इथं सध्या आहेत. (२) स्वित्र्झलडच्या दृश्यकलावंत मारी वेलार्डी यांनी साकारलेलं, मानवमुक्तीचा जाहीरनामाच ठरणारं प्रदर्शन याच संग्रहालयाच्या मागच्या भागात आहे.
दयानिता सिंग या महत्त्वाच्या भारतीय फोटो-कलावंत. प्रामुख्यानं माणसांचेच फोटो टिपत असूनही, त्यांनी आयुष्यांचा आणि समाजाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला, म्हणून त्या कलावंत. या फोटोंचं एकत्रित, सामूहिक दर्शन घडावं यासाठीही काही प्रयोग दयानिता यांनीच केले, त्यापैकी एक म्हणजे ‘सूटकेस म्यूझियम’! पार्टिशनसारख्या उघडणाऱ्या घडीच्या फळय़ांवर त्यांनी फोटो लावले आहेत. शिवाय असंच एक घडीचं प्रदर्शन, खरोखरच मोठय़ा सूटकेसमध्ये मावेल असं केलं आहे. ही तांत्रिक बाब जरी बाजूला ठेवली तरी, वरच्या मजल्यावरल्या दालनांतही त्यांचे भरपूर फोटो एकाचवेळी पाहायला मिळतात, ही या प्रदर्शनातली चांगली बाब. कारण त्यामुळे दयानिता यांचे, पुस्तकरूपानं प्रकाशित झालेले बहुतेक फोटो मोठय़ा आकारात पाहाता येतील.
मारी वेलार्डी यांच्या प्रदर्शनाचं नाव ‘संभाव्य युगांची संहिता’ असं आहे. आयुष्यातले अन्य महत्त्वाचे निर्णय घेणं आणि त्यांची जबाबदारी स्वत स्वीकारून एक भयमुक्त, दबावमुक्त समाज निर्माण करणं यांसाठी स्त्रिया- आणि पुरुषही- आत्मनिर्भर होवोत, अशी इच्छा या पोस्टर- प्रदर्शनवजा प्रदर्शनामागे आहे. ही ‘संहिता’ इंग्रजीप्रमाणेच मराठीतही सुलेखनवजा दृश्यरूपानं साकारली आहे. (याउलट, दयानिता यांच्या प्रदर्शनाची साधी माहितीसुद्धा मराठीत नाही!) टेबलांभोवती फिरून करण्याचं हे ‘संभाव्य युगांची संहिता’वाचन सर्वानीच करावं, त्यावर चर्चाही व्हावी. मुळात भारतातल्या एका महिलाकेंद्री प्रकाशनसंस्थेच्या सहकार्यानं आणि अनेकींशी चर्चेनंतर हे प्रदर्शन साकारलं आहे.