दुसऱ्या वर्गाच्या तिकीटासाठी तीन रुपये अधिक मोजावे लागणार
मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पाचा अधिभार उपनगरी प्रवासाच्या तिकीट आणि पासवर लावण्यात आला असून मंगळवार, १ जानेवारीपासून त्याची अमलबजावणी करण्यात येत आहे.
उपनगरी तिकीटाचे दुसऱ्या वर्गाचे भाडे तीन रुपयांनी तर प्रथम वर्गाचे भाडे सहा रुपयांनी वाढले आहे. मासिक पासामध्ये दुसऱ्या वर्गाच्या भाडय़ात ११ ते ५० किमी अंतरासाठी ३० रुपये, ५१ ते १०० किमीसाठी ४५ रुपये तर १०१ ते १५० किमी अंतरासाठी ६० रुपये अधिभार द्यावा लागणार आहे. प्रथम वर्गाच्या भाडय़ात हीच वाढ अनुक्रमे ६०, ९० आणि १२० रुपयांची आहे.
त्रमासिक पासामध्ये दुसऱ्या वर्गाच्या भाडय़ात ९०, १३५ आणि १८० रुपये अधिभार द्यावा लागणार आहे तर प्रथम वर्गाच्या भाडय़ात १८०, २७० आणि ३६० रुपये अधिभारापोटी मोजावे लागणार आहेत.