भायखळा येथील जे.जे.रुग्णालयातील डी.एम.पेटीट या १३० वर्षे जुन्या इमारतीच्या खाली भुयार आढळले आहे. या इमारतीचा परिसर हा नर्सिंग कॉलेजचा असून सापडलेला भुयारी मार्ग हा प्रसूती विभाग ते लहान मुलांच्या विभागापर्यंत आहे. जे जे रुग्णालय प्रशासनाने या भुयारी मार्गाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवले असून त्यादृष्टीने पुढील कार्यवाही सुरू झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>मुंबई: हाजीअली दर्गा येथे दहशतवादी हल्ल्याची धमकी

जे जे रुग्णालयाच्या आवारात डी.एम.पेटीट इमारतीच्या आवारात गुरुवारी अचानक भुयारी मार्ग सापडला. रुग्णालयाची तपासणी करताना डॉ.अरुण राठोड यांच्या निदर्शनास हा भुयारी मार्ग आल्याचे दिसून येते,त्यानंतर त्यांनी ह्या भुयारी मार्गाची पूर्ण तपासणी सुरक्षारक्षकांच्या सहाय्याने केली, भुयारी मार्ग हा २०० मीटरचा आहे.

हेही वाचा >>>मुंबई: खार स्थानकात एलीव्हेटेड डेक, स्कायवॉक, पादचारी पूल

इमारतीच्या आवारात भुयारी मार्ग असल्याची आम्हाला कल्पना होती. पण ते नक्की कुठे आहे ते माहीत नवहते. इमारत १८९२ साली बांधलेली आहे. आता या भुयाराचे एक तोंड सापडले असून दुसरा मार्ग कुठे उघडतो त्याचा शोध घ्यावा लागणार आहे. याबाबत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयालाही कळवले आहे, अशी माहिती जे जे रुग्णालताच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली.

हेही वाचा >>>महात्मा गांधीच्या अनुयायीच्या साहित्यकृतीच्या अनुवादाचे प्रकरण :आक्षेप मागवण्यासाठी जाहीर नोटीस काढण्याचे न्यायालयाचे आदेश

जे.जे.रुग्णालयातील बांधकाम हे प्रामुख्याने ब्रीटिशकालीन आहे तसेच तेथील इमारती या १७७ वर्षांपूर्वी बांधण्यात आल्या आहेत,या भुयारी मार्गाची माहिती मुंबई जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आली असून पुरातत्व विभागाकडूनही या भुयारी मार्गाची पहाणी होणार आहे. वॉर्ड च्या रुग्णांना आपात्कालीन वेळेस बाहेर पडण्यासाठी हा भुयारी मार्ग असल्याचे सांगितले जात आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subway found in jj hospital mumbai print news amy