लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: धमकी देवून बलात्कार केल्याच्या गुन्ह्यातील आरोपीला गावठी कट्ट्यासह पकडण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. आरोपी त्याच्या साथीदारासह चोरी करण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना पकडण्यात आले. आरोपींकडून देशी कट्टा, चाकू जप्त करण्यात आले आहेत.

अंधेरी येथील डी. एन. नगर परिसरात दोन संशयीत देशी कट्टा व जिवंत काडतूस घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष-९ च्या पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे डी. एन. नगर परिसरातील न्यू लिंक रोड येथे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बुधवारी सापळा रचला होता. आरोपींना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे एक लोखंडी गावडी कट्टा, गावडी कट्टयाची तीन जिवंत काडतुसे, तीन स्टील बटण असलेला रामपुरी चाकू, एक स्टेनलेस स्टिलचे पिस्टल, पिस्टलची २० जिवंत काडतुसे सापडली.

आणखी वाचा-मुंबई: अनेक वर्षांनंतर राणीची बाग अभ्यासक विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने गजबजली

आरोपींविरोधात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी कलम ३, २५ शस्त्र अधिनियम सह कलम ३७ (१) (अ) १३५ म.पो.का. अन्वये गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक करण्यात आली. अरबाज इशरत खान (२३) व ताबीश झाकीर हुसैन खान (२२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. चौकशीत एका आरोपीने मेघवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरूणीला धमकावून तिच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे मेघवाडी पोलिसांनाही त्याचा ताबा घेण्याबाबत कळवण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.