फक्त शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेलेच लोक देशासाठी काहीतरी चांगली कामगिरी करतात असं नाही तर आपल्या देशात बरेच असेल लोक आहेत जे आपापल्यापरिने देशासाठी योगदान देत असतात. सर्वांमध्येच काही ना काही कमतरता असतात. पण फार कमी माणसं अशी असतात की ते आपल्या कमतरता मागे सारून आयुष्यात एक वेगळी उंची गाठतात. अशीच एक गोष्ट आहे नालासोपाऱ्याच्या रुही शिंगाडे हिची. २७ वर्षीय रुहीची उंची अवघी ४ फूट इतकी आहे. पण तिची कमी उंची कधीच तिच्या स्वप्नांच्या मध्ये आली नाही. कोणतीही खंत न बाळगता रुही आपल्या लक्ष्यावर ठाम राहिली आणि क्रीडा क्षेत्रात आपलं वेगळेपण तिने आंतरराष्ट्रीय पातळीवर सिद्ध केलं आणि देशासाठी अनेक पदकं जिंकली. चला तर मग, या व्हिडीओमधून जाणून घेऊया रुहीचा हा प्रवास…
रुहीच्या या प्रवासात तिच्या आईवडिलांचा मोठा वाटा होता. आईवडिलांच्या पाठिंब्याने तिने क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर यश संपादन केले. तिच्या या परिश्रमाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने तिला एकलव्य पुरस्काराने सन्मानित केले. जिद्द असेल तर आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो याचं रुही हे एक उत्तम उदाहरण आहे.